जीनिव्हा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून (25 मार्च) 21 दिवसांचा (14 एप्रिलपर्यंत) लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे कोरोना कसा रोखला जाणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. (Why India Lock downed during Corona)
कोरोना संक्रमण साखळी 21 दिवसांची असते. बहुतेक त्यामुळेच सरकारने 21 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केलं आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार संचारबंदीमुळे आपोआपच थेट संपर्कबंदी होईल. त्यामुळे अपेक्षित कोरोनाबाधितांची संख्या 62 टक्क्यांनी कमी होईल. तज्ज्ञांना अपेक्षा आहे की, जास्त गंभीर स्थितीची शक्यताही 89 टक्क्यांनी घटेल. तज्ज्ञांनी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तयार केलेल्या गणितीय मॉडेलच्या आधारे हे अंदाज व्यक्त केले आहेत.
देशात प्रवेशाच्या वेळी प्रवाशांचं केलेलं स्क्रिनिंग सामूहिक संसर्गाचा धोका तीन दिवस ते तीन आठवड्यांनी लांबवतं. पण सार्वजनिक आरोग्य सेवेची सज्जता आणि समाजाची तयारी यावरही संसर्गावर नियंत्रण अवलंबून असतं.
21 दिवसांचं लॉकडाऊन
देश आणि देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी संचारबंदी लागू करत आहे. जिथे आहात तिथेच राहा, पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून विनंती करतो, असं सांगत केंद्र सरकारने प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेश, शहर, गावं यांचं सीमा लॉकडाऊन केल्या आहेत.
हेही वाचा : संपूर्ण देशात लॉकडाऊन, कुठे काय सुरु आणि काय बंद?
चीन, इटली, जर्मनी, अमेरिका यांची आरोग्य यंत्रणा उत्तम आहे, तरीही तिथली परिस्थिती भीषण झाली आहे. त्यामुळे मोठं संकट टाळण्यासाठी घरातून बाहेरच पडू नका, असं आवाहन मोदींनी केलं.
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी 15 हजार कोटींच्या पॅकेजची पंतप्रधान मोदींकडून घोषणा करण्यात आली. व्हेंटिलेटर, मास्क आणि अन्य साधनं वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. (Why India Lock downed during Corona)
We are marking these festivals at a time when our nation is battling the COVID-19 menace.
The celebrations will not be like they are usually but they will strengthen our resolve to overcome our circumstances.
May we keep working to fight COVID-19 together.
— Narendra Modi (@narendramodi) March 25, 2020
जगात काय स्थिती?
कोरोना व्हायरसने बाधित जगभरातील रुग्णांची संख्या 3 लाख 72 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तर आतापर्यंत 16 हजारांहून अधिक जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत, अशी माहिती ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूएचओ) आपल्या दैनंदिन कोरोनाव्हायरस आजाराच्या (कोविड -19) अहवालात दिली आहे.
जगभरात 3 लाख 72 हजार 757 जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी बहुतांश म्हणजे 1 लाख 95 हजारांपेक्षा जास्त केसेस युरोपमध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. एकूण 16 हजार 231 मृतांपैकी 10 हजारांपेक्षा जास्त मृत्यू युरोपियन प्रदेशात झाले.
अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता देश कोरोना व्हायरस साथीच्या आजाराचे नवे केंद्रबिंदू ठरु शकतो, अशी भीती WHO चे प्रवक्ते मार्गारेट हॅरिस यांनी व्यक्त केली होती. (Why India Lock downed during Corona)