आतापर्यंत रस्ते अपघाताचे भीषण फोटो तुम्ही पाहिले असतील. असाच एक विचित्र अपघात नाशिकच्या सिन्नरमध्ये घडला आहे.
शहरातील महाविद्यालयासमोर एका हायवा ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रकने चक्क आठ वाहनांचा चक्काचूर केलं.
घटनास्थळावरील हे फोटो पाहून तुम्ही अपघाताच्या भीषणतेचा अंदाज लावू शकता.
पाच चारचाकी तर तीन दुचाकींचा यामध्य समावेश आहे.
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर हायवा ट्रकचा चालक फरार झाला आहे.
सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
ट्रकने आठ वाहनांना अशी धडक दिली आहे की यामध्ये सगळ्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
भर रस्त्यात असा भीषण अपघात झाल्याने थोडा वेळ वाहतूक कोंडी होती.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, सर्व अपघाती वाहनं बाजूला करण्याचं काम सुरू असून पोलीस हायवा ट्रकचा चालकच्या चालकाचा शोध घेत आहेत.