पुणे : मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का?, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी साई संस्थानला केला आहे. शिर्डीतील साईमंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असाल तर भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये, असे आवाहन साई संस्थानतर्फे मंगळवारी (30 नोव्हेंबर) करण्यात आले. तशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले होते. यावर बोलताना देसाई यांनी हा सवाल केला. त्या पुणे येथे ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Trupti Desai on Saibaba Sansthan and costume of devotees)
साई संस्थानच्या या आवाहनावर बोलताना, अशा आशयाचे फलक लावणे म्हणजे हा भारतीय संविधानाचा अवमान असल्याचे त्या म्हणाल्या. “शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्तगण देश-विदेशातून येतात. हे भक्त वेगवेगळ्या जातीधर्माचे असतात. शिर्डी संस्थानने मंदिर परिसरात भक्तांनी सभ्य पोशाख घालून यावं या आशयाचा एक बोर्ड लावला आहे. भारत देशात संविधान आहे. संविधानाने अभिव्यक्ती आणि व्यक्तिस्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे कुणी काय बोलाव?, काय बोलू नये हा?, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा संविधानाचा आपमान आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच, मंदिरामध्ये कशा पद्दतीचे कपडे घालायला पाहिजेत याचे भान भक्तांना आहे. भक्तांची श्रद्धा कपड्यांवरुन ठरवू शकत नाहीत. श्रद्धा महत्वाची असते, असं वक्तव्य त्यांनी साई संस्थानला उद्देशून केलं.
यावेळी तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला मंदिर परिसरातला तो बोर्ड काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. अनेक मंदिरात, अगदी शिर्डी मंदिरातसुद्धा पुजारी अर्धनग्न अवस्थेत असतात. यावर अर्धनग्न पुजाऱ्यांसाठी मंदिरात प्रवेश नाही असा बोर्ड भक्तांनी कधीही लावलेला नाही असे, त्या म्हणाल्या. तसेच, जर तुम्ही काढला नाही तर आम्हाला येऊन तो बोर्ड काढावा लागेल असा ईशारादेखील त्यांनी साई संस्थानला दिला आहे.
फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईमंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं,’ असं आवाहन साईबाबा संस्थानकडून (Saibaba Sansthan) करण्यात आलं आहे. मंदिरात भारतीय पेहरावात यावं, अशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. “साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण तोकडे कपडे घालून येत असल्याचे निरीक्षणात आले आहे. तीर्थस्थळी येताना भारतीय पेहरावात यावं,” असं साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितलं
होय, मी काँग्रेसची विधानपरिषदेची ऑफर नाकारली; शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांचा खुलासाhttps://t.co/9bd1kRtYcH@UrmilaMatondkar #ShivSena @ShivSena #UrmilaMatondkar
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
संबंधित बातम्या :
अबब! अवघ्या 9 दिवसांत साईचरणी कोट्यवधींचं दान
शिर्डीमध्ये मंदिर सुरू झालं पण भाविक आणि प्रशासन नियम पाळतंय का? वाचा रिअॅलिटी चेक
(Trupti Desai on Saibaba Sansthan and costume of devotees)