हळद आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. त्यामुळे फक्त किरकोळ आजारांसाठी नाही तर गंभीर आजारावर सुद्धा हळद महत्त्वपूर्ण काम करते. हळदीच्या झाडाच्या मुळांमधून निघणारा करक्यूमिन हा पोटामध्ये होणाऱ्या कर्करोग रोखण्यास अतिशय उपयुक्त आहे.
भारतीय आहार कसा ठेवतो कॅन्सरला दूर
भारतीय प्रत्येक पदार्थ बनवताना त्यात हळदीचा वापर करतात. विशेष करुन भारतीय रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हळद आणि दूध अगदी रोज पितात. तसंच जेवणात रोज हळद दाळ खातात. त्यामुळे रोजच्या जेवणात भारतीयांच्या पोटात हळद जाते. याचा फायदा त्यांना रोगांपासून दूर राहण्यासाठी होतो. खास करुन पोटाच्या कर्करोगापासून आपला बचाव होतो. हळदीमधील करक्यूमिन कर्करोगावर कसं काम करते. हळद पोटातील कर्करोगाचं प्रसार, संचार आणि आक्रमक शक्तीला रोखण्यास मदत करते. करक्यूमिन आपल्या शरीरात कर्करोगाचे विषाणू पसरण्यापूर्वीच त्यांना रोखण्याचे काम सुरु करतात. एका रिसर्चप्रमाणे करक्यूमिनमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत. जे स्तनाचा कर्करोग, कोलन कर्करोग, आतड्याचा कर्करोग आणि त्वचेच्या कर्करोगावर रामबाण उपाय म्हणून समोर येतं. त्यामुळे भारतीयांना निरोगी राहण्यासाठी आणि कर्करोगापासून दूर ठेवण्यासाठी हळद मोठी भूमिका बजावतो. एका रिसर्चनुसार निरोगी राहण्यासाठी एका व्यक्तीला दिवसात 500-2 हजार मिलीग्राम आवश्यक आहे. याचा तुम्ही नुसती हळद खात राहू नये. भारतीयांच्या जेवणात प्रमाणात हळद आहे.
संशोधनातून सिद्ध
हळदीच्या झाडाच्या मुळांमधून निघणारे करक्यूमिन पोटाचा कर्करोग रोखण्यासाठी फायदेशीर असल्याचं फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलो आणि फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पाराने केलेल्या संशोधनातून पुढे आलं आहे. याबद्दलची माहिती या संशोधकांनी ब्राझीलमध्ये दिली.
हळदीचे दूध कर्करोगासाठी फायदेशीर
हळदीचं दूध आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम आहे. हळदीच्या दूधाचे अनेक फायदे आहे. रोज रात्री हळदीचं दूध घेतल्यास अनेक फायदे होतात.
हळदीच्या दूधाची रेसिपी
साहित्य
2 कप दूध
¾ टीस्पून हळद
½ टीस्पून काळी मिरी
1 इंच दालचिनी
1 इंच आले
1 टीस्पून मध
कृती
भांड्यात 2 कप दूध घ्या. त्यात हळद, काळी मिरी, दालचिनी, आले घाला. आणि मंद आचेवर दूध गरम करा. जर तुम्हाला दूध गरम प्यायचं असेल तर साखर घालून प्या. किंवा मधाचा वापर करायचा असेल तर दूध जरा थंड होऊ द्या मग त्यात मध घाला.
इतर बातम्या
सीलबंद पाण्याची ‘एक्स्पायरी’ तपासली का? जाणून घ्या महत्वाची कारणे