लंडन: इंग्लंडच्या चेस्टर पक्षीसंग्रहालयात जगातील सर्वात छोट्या दोन माकडांचा जन्म झाला आहे. जगातील माकडांची सर्वात लहान प्रजाती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिग्मी मॉर्मासेट्स प्रजातीची ही वानरं असल्याचं पक्षी संग्रहालय प्रशासनाचे म्हणणे आहे. पिंग-पोंग बॉल एवढ्या या पिग्मी मॉर्मासेट्सची उंची 2 इंच असून वजन अवघे 10 ग्रॅम आहे. (Twin monkeys measuring just 2 inches born at Chester Zoo)
ही दोन्ही माकडं पिंग-पोंग चेंडू एवढे आहेत, असं या माकडांची देखभाल करणाऱ्या हॉबी वेब यांनी सांगितलं. मात्र, ही दोन्ही पिलं नर आहेत की मादी? हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. या दोन्ही माकडांना जन्म देणाऱ्या माकडाचे नाव जो आणि बाल्ड्रिक आहे. जो मादीचं वय 3 वर्षे असून बाल्ड्रिकचं वय 4 वर्षे आहे.
मादने वजन वाढल्यानंतरही या जुडवा पिल्लांना जन्म दिला. या दोन्ही पिल्लांना जन्म दिल्यानंतर नर आणि मादीने आपल्या दोन्ही पिल्लांना पाठिवर बसवून त्यांना फिरवणे सुरू केले, असं हॉबीचं म्हणणं आहे. दोन्ही जुळी माकडं सभोवतालचं वातावरण समजून घेत असल्याचंही हॉबी म्हणाले.
पिग्मी मॉर्मासेट्स प्रजातींच्या माकडांचा आकार छोटा असतो. मादीला आकर्षित करण्यासाठी ही माकडं जोरजोरात ओरडतात. संपूर्ण परिसरात यांची आवाज ऐकू जाईल एवढा जोराचा आवाज ते काढतात, असं चेस्टर पक्षी संग्रहालयातील डेप्युटी क्युरेटर डॉ. निक डेव्हिस यांनी सांगितलं (Twin monkeys measuring just 2 inches born at Chester Zoo).
पिग्मी मॉर्मासेट्स प्रजातीची माकडं पश्चिमी ब्राझिल, पेरू, इक्वाडोर आणि कोलंबियाच्या साऊथ अमेरिकेतील रेनफॉरेस्टमध्ये आढळतात.
दोन्ही जुळी माकडं पिग्मी मॉर्मासेट्स प्रजातीची आहेत.
आवाजाने मादीला आकर्षित करतात
ही प्रजाती केवळ पश्चिमी ब्राझिल, पेरू, इक्वाडोर आणि कोलंबियाच्या साऊथ अमेरिकेतील रेनफॉरेस्टमध्ये आढळतात.
VIDEO : SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 8 December 2020https://t.co/4aok6jDAnp
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2020
Twin monkeys measuring just 2 inches born at Chester Zoo
संबंधित बातम्या:
कुत्रे फिरवण्यासाठी तगडा पगार, वर्षाकाठी 29 लाखांची ऑफर, निवृत्तीनंतर पेन्शनही
Corona : न्यूयॉर्कमध्ये वाघाला कोरोना, कात्रज प्राणीसंग्रहालयात प्रचंड खबरदारी