देहूगाव – इंद्रायणी नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. साहील विजय गौड ( वय 10 वर्षे ) व अखिल विजय गौड ( वय 8 वर्षे, सध्या राहणार देहूगाव,मुळगाव, गोरखपूर) आहे. मृत मुले सकाळी इंद्रायणी नदीकाठी गेली होती. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले नदीच्या पाण्यात बुडाली आसावित असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला मुलांच्या वडिलांनी व इतर बांधकाम कामगारांनी पाण्यात शोधाशोध केली. मात्र त्यांचे मृतदेह हाती लागले नाहीत. या घटनेमुळे कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.
कार्तिकी एकादशी असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. मृत मुलाचे वडील इंद्रायणी पुला नजिक असलेल्या बांधकाम साईटवर कामगार म्हणून काम करतात. मजुरीच्या कामासाठी उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून हे कुटुंब देहूमध्ये आले आहे.
मुलांच्या शोधासाठी पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दळवी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुलांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पी एम आर डी एचे अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे. त्यांना मदतीसाठी एनडीआरएफच्या जवानांना देखील बोलावण्यात आलेले आहे. हवेली तहसिलदार गीता गायकवाड व तलाठी अतुल गिते देखील घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.नदीमध्ये शोधकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र दअद्याप मुलांचा शोध लागलेला नाही.
लवकरच मुंबईतील आठ मॉल्स रात्री कार पार्किंगला परवानगी देणार, मुंबईकरांची पार्किंगची समस्या कमी होणार
भाजप पदाधिकारी अमोल इघे हत्या प्रकरण, संशयित आरोपी महिन्याभरापूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत?
Jalna | जालना एपीएमसी कार्यालयावर ईडीचा छापा, 10 ते 12 ठिकाणी ईडीची छापेमारी