नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये फायझरची कोरोनाची लस दिल्यानंतर दोन लोकांची तब्येत बिघडली आहे. ही बाब ब्रिटनने अत्यंत गंभीरपणे घेतली असून कोरोना लस कुणी घ्यावी आणि कुणी घेऊ नये, याबाबतच्या सूचना ब्रिटीश प्रशासनाने जारी केल्या आहेत. ज्यांना गंभीर अॅलर्जीची समस्या आहे. त्यांनी सध्या तरी कोरोनाची लस टोचून घेऊ नये. ज्या लोकांना औषधं, अन्न किंवा लसीची अॅलर्जी आहे त्यांनी फायझरची लस घेऊ नये, असं आवाहन ब्रिटनच्या आरोग्य विभागाने केलं आहे. (Two patients in U.K. Suffer Allergic Reaction to Pfizer Covid-19 Vaccine)
मंगळवारपासून ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू झालं आहे. परंतु, आतापर्यंत केवळ दोन लोकांना या लसीची अॅलर्जी झाल्याचं आढळून आलं आहे. या लसीच्या सर्व बाजू तपासूनच त्याला मंजुरी देण्यात आल्याचं ब्रिटनच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे. अशावेळी दोन लोकांशिवाय कुणावरही या लसीचा वेगळा परिणाम झाला नसल्याचंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
प्रत्येकाला अॅलर्जी होईलच असं नाही
कोरोना लसीची ट्रायल करताना औषधांची अॅलर्जी असलेल्या कोणत्याही व्यक्तिचा लसीकरणात समावेश करण्यात आलेला नव्हता, असं फायझर बायोटेकने (Pfizer-BioNTech) म्हटलं आहे. या व्हॅक्सीनमुळे प्रत्येकालाच अॅलर्जी होईल, यात काही तथ्य नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कोंबडीचे अंडे, लस आणि अॅलर्जी
लोक जेलाटीन किंवा एग्ज प्रोटीन किंवा या व्हॅक्सीनबाबत संवेदनशील असू शकतात. ज्या लोकांना अंड्यांची अॅलर्जी आहे, त्यांना व्हॅक्सीन न घेण्याची डॉक्टरांनी सूचना केलेली असेल तर त्यांनी तसं लस घेण्यापूर्वी स्पष्ट केलं पाहिजे. कारण कोरोनाची व्हॅक्सीन बनविण्यासाठी कोंबडीच्या अंड्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही व्हॅक्सीन घेतल्यानंतर अंड्यांची अॅलर्जी असलेल्यांमध्ये अॅलर्जी होऊ शकते. कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांच्या अंगावर व्रण उमटू शकतात, त्वचेला जळजळ होऊ शकते, खोकला वाढू शकतो आणि श्वास घेण्यास त्रासही होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
अशी अॅलर्जी जाणवतेय का?
लस घेतल्यानंतर खांद्यावर किंवा जिथे लस टोचून घेतली तिथे दुखू शकतं, ताप येऊ शकतो, अंगात कणकणी जाणवू शकते, असंही तज्ज्ञांनी सांगितलं. ज्या लोकांवर व्हॅक्सीनचा प्रयोग करण्यात आला त्यांना थकवा, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आदी त्रास होत असल्याचं फायझरच्या अभ्यासातून आढळून आलं होतं. मात्र, कुणाला अॅलर्जी झाल्याचं दिसून आलं नव्हतं. त्यामुळे अॅलर्जी होणं हे अनपेक्षित असून ही अॅलर्जी फार कमी वेळ राहणारी आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आणखी लक्षणे जाणवतात का?, संशोधन सुरू
कोरोना लस घेतल्यानंतर रुग्णांना अजून गंभीर लक्षण जाणवत आहेत का? यावर संशोधन सुरू आहे. मात्र त्यासाठी थोडा अवधी जाणार आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात लस देण्यात येत आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, बुजुर्ग लोकांना व्हॅक्सीन दिली जात आहे. त्यानंतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनाही ही लस दिली जात आहे. भारतातही अर्धा डझन व्हॅक्सीनची ट्रायल सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. (Two patients in U.K. Suffer Allergic Reaction to Pfizer Covid-19 Vaccine)
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 10 December 2020 https://t.co/ceY7lt64mU @CMOMaharashtra @PMOIndia #TopNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 10, 2020
संबंधित बातम्या:
सीरम-भारत बायोटेकने लसीसंदर्भात सविस्तर माहिती द्यावी; तज्ज्ञ समितीची मागणी
कोरोनामुळे AIIMS रुग्णालयाचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द
रशियातील कोरोनाची लस घेण्यासाठी ‘ही’ अट; नागरिकांना सक्तीच्या सूचना
(Two patients in U.K. Suffer Allergic Reaction to Pfizer Covid-19 Vaccine)