पुणे : पुण्यात दोन 21 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला आहे. या दोघांच्या मृत्यूचं कारणही धक्कादायक आहे. घरातील पेस्ट कंट्रोलने दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजय बेलदार आणि अनंता खेडकर असे दोन दुर्दैवी तरुणांची नावं आहेत.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेला अजय बेलदार हा 21 वर्षीय तरुण मूळचा जळगाव जिल्ह्यातील असून, अनंता खेडकर हा 21 वर्षीय तरुण मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील आहे. दोघेही पुण्यात खासगी क्षेत्रात काम करत होते. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघेही राहत होते.
मंगळवारी (5 मार्च) झोपताना दोघांनी ढेकणं मारण्यासाठी पेस्ट कंट्रोल केलं होतं. मात्र श्वास गुदमरल्यानं सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
पेस्ट कंट्रोल करताना काय काळजी घ्याल?