मुंबई : विद्यापीठांच्या अंतिम परीक्षेच्या निर्णयावरुन राज्यात गोंधळाची स्थिती आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या संसर्गाचा धोका पाहता परीक्षा न घेण्याची भूमिका घेतील आहे, तर यूजीसीने राज्यांना परीक्षा घेण्याबाबत पत्र पाठवलं आहे. यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे (Uday Samant on UGC and Final Exam ). यूजीसीचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा आहे. महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा शक्य नाही, असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे.
विद्यार्थ्यांकडून अंतिम परीक्षेवरुन राजकारण सूरु असल्याचा आरोप होत आहे. यावरुन विद्यार्थ्यांमध्ये असंतोषही वाढला आहे. हाच मुद्दा पकडत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि परीक्षांसाठीची संसाधने याबाबत लिहित सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
उदय सामंत म्हणाले, “20 एप्रिलला युजीसीने महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. याप्रमाणे प्रत्येक राज्यातील आणि त्या त्या विद्यापीठातील परिस्थिती पाहून त्या त्या ठिकाणी अंतिम परीक्षेबाबत निर्णय घ्यावा. एप्रिल-मेमध्ये दिलेल्या पत्रानंतर आम्ही पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी काही निर्णय घेतले. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 4 महिने यूजीसीने कोणतंही पत्र पाठवलं नाही.”
“विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणाचा, नोकरीचा, कॅम्पस मुलाखतीचा प्रश्न होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी कुलगुरुंशी चर्चा केली होती. या बैठकीत कोरोनाचा संसर्ग पाहता विद्यार्थ्यांना एकत्र जमवणे धोक्याचे होते, ते योग्य नव्हते म्हणून आपण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला,” असं उदय सामंत म्हणाले.
‘यूजीसीचा परीक्षा घेण्याचा निर्णय क्लेषदायक आणि धक्कादायक’
उदय सामंत म्हणाले, “यूजीसीने ऑनलाईन परीक्षा घेण्यास सांगितलं आहे. मात्र, आज महाराष्ट्रात प्रत्येक गावात ऑनलाईनची व्यवस्था आहे का? याचं खरं उत्तर हवं असेल तर नाही असं आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा होणार नाहीत, असं काही कुलगुरुंनीच आम्हाला सांगितलं आहे. अशावेळी यूजीसीने परीक्षांचा निर्णय घेतला.”
“यूजीसीचा हा निर्णय क्लेषदायक आणि धक्कादायक आहे. म्हणून मी तातडीने मनुष्यबळ विकास मंत्री, गृहमंत्री अमित शाह आणि यूजीसीला पत्र लिहिलं. यात यूजीसीने आम्हाला पत्र पाठवून गाईडलाईन्स दिल्या असल्या तरी महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं योग्य ठरणार नाही. हे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. म्हणूनच या निर्णयाचा पुनर्विचार केला पाहिजे,” असंही सामंत म्हणाले.
हेही वाचा :
शिवबंधन-घड्याळ-शिवबंधन, चार दिवसात पारनेरच्या पाच नगरसेवकांबाबत काय-काय घडले?
निलेश लंकेंनी राष्ट्रवादीत आणलं, मिलिंद नार्वेकरांनी ‘करुन दाखवलं’, पारनेरच्या नगरसेवकांची घरवापसी
अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजेंना फोन, ‘सारथी’ प्रश्नी बैठकीला येण्याची विनंती
Uday Samant on UGC and Final Exam