सातारा : भाजपा नेते उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) हे त्यांच्या खास शैलीमुळे कायमच चर्चेत असतात. मजेदार स्टाईल आणि हटके बोलण्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. आज मात्र, उदयनराजेंचा एक खास अंदाज पाहायला मिळाला आहे. आज उदयनराजे भोसले यांच्या लग्नाचा वाढदिवस (happy anniversary) आहे. यामुळे त्यांनी फेसबूकवर पोस्ट (Facebook Post) शेअर करत पत्नीलाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (Udayanraje bhosale wish happy anniversary to wife from in special style)
राजकारण आणि समाजकारण करत असताना पत्नीची साथ खूप मोलाची असते ती राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला दिली असं म्हणत उदयनराजेंनी पत्नीचं कौतूक केलं आहे. राजकारणात आलं की तसा कुटुंबासाठी फार वेळ मिळत नाही. पण या सगळ्यात पत्नीने मोलाची साथ दिल्याचं उदयनराजेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी दोघांचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे.
दमयंतीराजे भोसले असं उदयनराजेंच्या पत्नीचं नाव आहे. राणीसाहेबांच्या भक्कम साथीमुळेच मतदारसंघातील व राज्यातील असंख्य लोकांच्या समस्या व प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी बळ मिळतं असंही उदयनराजेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. उदयनराजेंच्या या फेसबूक पोस्टला त्यांच्या चाहत्यांनी तुफान लाईक आणि कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या पत्नीचं कौतूक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पोस्टमध्ये काय म्हणाले उदयनराजे भोसले?
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे भोसले यांनी पोस्ट शेअर करत पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्यांनी लिहलं की, ‘आज आमच्या लग्नाचा वाढदिवस.
राजकारण आणि समाजकारण करत असताना पत्नीची साथ खूप मोलाची असते ती राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला दिली…त्यांच्या भक्कम साथी मुळेच मतदारसंघातील व राज्यातील असंख्य लोकांच्या समस्या व प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी बळ मिळते.
#Anniversary‘
खरंतर, उदयनराजे हे त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. इतकंच नाही तर उदयनराजे भोसले अनेकदा सुसाट बाईकही चालवताना दिसतात. एकदा तर निवडणुकीत उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी उदयराजेंनी बाईकवर स्वारी केली होती. त्यांची हिच हटके स्टाईल आज पुन्हा एकदा दिसली आहे.
इतर बातम्या –
Udayanraje Bhosale | MPSC परीक्षेवर छत्रपती उदयनराजे भोसले यांची पोस्ट
देवेंद्र माझा खास मित्र, त्याचं काय चुकलं? : उदयनराजे भोसले
(Udayanraje bhosale wish happy anniversary to wife from in special style)