नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असल्याने स्थानिक निवडणुकाही एकत्र लढण्याचे संकेत तीनही पक्षाकडून मिळत आहेत. राज्यातील इतर महापालिकांमधून भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा रंगली आहे. नाशिकमध्ये तर या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. (Uddhav Thackeray will be together with Mahavikas Aghadi in Nashik Municipal Corporation election)
नाशिक महापालिकेत सध्या भाजपची एकहाती सत्ता आहे. 122 नगरसेवकांपैकी तब्बल 65 नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे आतातरी महापालिकेवर भाजपचा झेंडा आहे. मात्र, आगामी महापालिकेच्या निवडणुकीत जर महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्रित येऊन लढले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरू शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर स्थानिक राजकारणात ही खलबत सुरू झाली आहे.
Maratha Reservation : अशोक चव्हाण की उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा विषय आता नाही : चंद्रकात पाटील
या सगळ्यात मात्र, जागा वाटपाचा तिढा समोर येऊ शकतो. शिवसेनेचे 35 नगरसेवक सभागृहात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस 6, कॉग्रेस 6, मनसे 5, आरपीआय 1 आणि अपक्ष 4 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे जास्त नगरसेवक असल्यामुळे शिवसेनेने जर समजूतदारपणा दाखवला नाही तर मोठा गोंधळ होऊ शकतो. यामुळे यावेळी महाविकास आघाडीत शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
जर समसमान फॉर्म्युला राबवला तर वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही ही काम करू असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच मत आहे. विशेष म्हणजे कोण किती जागा लढणार हे वरिष्ठ पातळीवरूनच ठरवलं जाईल. त्यामुळे इथे भाजपचं नमोहरम करण्याच्या दृष्टीकोनातून प्लॅन केला गेला तर मात्र मोठी राजकीय खळबळ उडू शकते.
आताच उघडा जनधन खातं, मोफत मिळणार 10 लाखांचा विमा; सोबत आहेत धमाकेदार ऑफर्स
आगामी महापालिकेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मास्टर प्लॅन महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्याने जर चांगली रणनीती करून आखला तर राज्यात भाजपला मोठा धक्का बसू शकतो.
VIDEO | Sachin Kharat | हाथरस प्रकरणातील पिडीत कुटुंबाला लवकरच न्याय मिळेल, अशी अपेक्षा – सचिन खरात https://t.co/OejkzFuDBO
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 27, 2020
(Uddhav Thackeray will be together with Mahavikas Aghadi in Nashik Municipal Corporation election)