मुंबई: केंद्र सरकारही लोकल ( local service) सुरू करण्यास तयार आहे. पण त्यांना क्रेडिट घ्यायचं आहे. म्हणूनच ते लोकल सुरू करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केला आहे. (vijay wadettiwar claims central government did not resume mumbai local)
राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केला. मुंबईची लोकल सुरू करावी म्हणून आम्ही रेल्वेला चार पत्रं लिहिली आहेत. त्यानंतर त्यांनी आम्हाला एक पत्रं पाठवून नन्नाचा पाढा वाचला. त्या पत्रालाही आम्ही उत्तर दिलं. लोकल सुरू केल्यास पोलीस आणि सुरक्षा रक्षक तैनात करणार असल्याचं आम्ही सांगितलं. तसेच प्रवाशांना कोणत्या रंगाचे पास द्यायचे, त्यांचा प्रवासाची वेळ काय असेल, तिकीट ऑनलाइन द्यायचे की कसे द्यायचे? आदी बाबींची माहिती आम्ही रेल्वेला कळवली होती. चार पानी पत्रं लिहून आम्ही त्यांना सविस्तर माहिती दिली. पण तरीही त्यांनी लोकल सुरू केल्यानंतर गर्दी उसळल्यास काय करणार? असा सवाल उपस्थित केला आहे. खरे तर त्यांनाही लोकल सुरू करायची आहे. पण फक्त क्रेडिट मिळावं म्हणून त्यांचा खटाटोप सुरू आहे. सर्व राजकारण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
राज्यातील मंदिरं सुरू करण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हिवाळा सुरू झाला आहे. दिल्लीत पारा घसरला आहे. त्यामुळे दिल्लीत एका दिवसात 60 हजार रुग्ण सापडले. नागपूरमध्येही पारा घसरला आहे. राज्यातील इतर भागातही थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे थंडीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका उद्भवू शकतो. म्हणूनच मंदिरे उघडण्याबाबत दिवाळीनंतर निर्णय घेतला जाऊ शकतो, असं सांगतानाच शेवटी जान है तो जहाँ है, असं त्यांनी सांगितलं. (vijay wadettiwar claims central government did not resume mumbai local)
शेतकऱ्यांना सोमवारपासून भरपाई, लोकलबाबत रेल्वेला पत्र, मंदिरांचा निर्णय दिवाळीनंतर : वडेट्टीवार https://t.co/deN57gC613 @VijayWadettiwar @CMOMaharashtra #Farmers #Compensation #Maharshtra #Temples
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांना सोमवारपासून भरपाई, लोकलबाबत रेल्वेला पत्र, मंदिरांचा निर्णय दिवाळीनंतर : वडेट्टीवार
अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्यांना तातडीने मदत द्या, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
(vijay wadettiwar claims central government did not resume mumbai local)