कोरोना संकटकाळातही शेतकरी थांबला नाही, तो लढला, उलट त्याने सुशिक्षितांना लढणं शिकवलं : सुनील केदार

| Updated on: Aug 15, 2020 | 3:41 PM

शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करुन सुशिक्षितांना कोरोनाविरोधाच्या लढाईत लढणं शिकवलं, असं वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार म्हणाले (Wardha Guardian Minister Sunil Kedar appreciate work of farmers).

कोरोना संकटकाळातही शेतकरी थांबला नाही, तो लढला, उलट त्याने सुशिक्षितांना लढणं शिकवलं : सुनील केदार
Follow us on

वर्धा : “कोरोना संकटकाळात अनेकांचा कामाचा वेग मंदावला. पण शेतकऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. शेतकरी आणि शेतमजूर यांचं काम सुरुच आहे. या संकट काळात शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करुन सुशिक्षितांना कोरोनाविरोधाच्या लढाईत लढणं शिकवलं”, असं मत वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं (Wardha Guardian Minister Sunil Kedar appreciate work of farmers).

देशभरात 74 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. वर्ध्यातही जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कमी लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रमात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्याचं कौतुक केलं.

“वर्धा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सगळी कामे बंद होती. पण शेतकरी आणि शेतमजूर शेतात राबत होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कठीण काळातही पेरणीचं काम केलं”, असं सुनील केदार म्हणाले. यावेळी सुनील केदार यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांचे आभारही मानले.

दरम्यान, या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्याहस्ते कोरोना संकटात झटणारे डॉक्टर, स्वयंसेवीसंस्था आणि पोलिसांना सन्मानित करण्यात आले (Wardha Guardian Minister Sunil Kedar appreciate work of farmers).

वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकसह अधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी होती. यंदा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची 150 वी जयंती साजरी होत आहे. वर्धेकरांसाठी ही एक अभिमानासह भाग्याची गोष्ट आहे. गांधीजींचे हे जयंती वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करायचं, असं मतही यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केलं.

 

हेही वाचा : आपके राज्य में बिना आपके परमिशन आ गये, राज्यपालांचा अजितदादांना मिश्कील टोला