पुणे : पुढील काही तास पुण्यासह सातारा, अहमदनगर आणि नाशिक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा सुटण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली. या भागापैकी वादळाची तीव्रता पुण्यात सर्वाधिक असेल, असंही त्यांनी नमूद केलं (Weather Forecasting of Pune Satara Nashik Ahmednagar by K S Hosalikar ).
के. एस. होसाळीकर म्हणाले, “पुण्यासह सातारा, अहमदनगर आणि नाशिक भागात आत्ता विजांच्या कडकडाटासह वादळी वारा सुटण्याची शक्यता आहे. पुण्यातील स्थिती अधिक तीव्र असेल. रडारवर 10 किलोमीटरपेक्षा अधिक उंचीचे ढग पाहायला मिळाले आहेत. पुणेकरांनो काळजी घ्या.”
Pune, Satara, Ahmednagar, Nasik isolated thunderstorm activity right now.
Pune must be intense ??. Height of clouds more than 10 km as seen from radar. Rest of the places mod and could cont never 3,4 hrs.
Take care Punekars pic.twitter.com/yZFzWuJf94— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 20, 2020
“सॅटेलाईटवरुन मिळालेल्या माहितीनुसार मागील 30 मिनिटांपासून पुणे, नाशिकसह मध्य महाराष्ट्र आणि शेजारील भागात विजा चमकतील. सर्वांनी काळजी घ्या,” असंही होसाळीकर यांनी नमूद केलं.
Lightning over Madhya Mah and adjoining areas in last 30 minutes, including Pune, Nasik…as seen from satellite products.
काळजी घ्या … pic.twitter.com/HKHvzpAGig— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 20, 2020
दरम्यान, राज्यात अतिवृष्टीनं हाहाकार माजला असताना पुण्यात मात्र भयानक परिस्थिती आहे. पुण्यातील हवेली तालुक्यात रविवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटीसदृश पाऊस झाला. यानंतर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी 51 ते 75 टक्के मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत धुवाधार पाऊस पडला. हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या अरबी समुद्रात आहे. तेथे त्याची तीव्रता कमी होत असून, पुढील 24 तासांमध्ये या क्षेत्राचा प्रभाव संपेल. पाठोपाठ बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे.
19 ऑक्टोबरपासून या क्षेत्राची तीव्रता वाढली असून त्यानंतर ते वायव्य दिशेला पूर्व किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यात आजपासून गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 20) हा अलर्ट पुण्या-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिला आहे. राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सोमवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या सूत्रांनी वर्तविला.
हेही वाचा :
Weather Alert: पुढच्या 24 तासांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, हवामान खात्याचा इशारा
पुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’
Weather Forecasting of Pune Satara Nashik Ahmednagar by K S Hosalikar