कोरोना नेमका कशानं बरा होता हे सांगणारे अनेक उपचार, थेरपी, औषधं यांची भरपूर चर्चा झाली. काहींचा वापरही केला जातोय. पण आता ओमिक्रॉननं नवं संकट उभं केलं असतानाच, कोरोना रोखणारा नवा शोध समोर आला आहे. आणि हा शोध आहे च्युइंगमचा. म्हणजेच अमेरीकन शास्त्रज्ञांनी काही प्रयोग केलेत आणि ह्या प्रयोगाअंती च्युइंगम खाल्ल्यानं कोरोना बरा होता किंवा तो रोखता येतो असा दावा केलाय. ह्या प्रयोगाचे निष्कर्ष अजून बाल्य अवस्थेत आहेत. पण अनेक शक्यतांचा शोध घेतला जात असतानाच, ही शक्यताही का गृहीत धरु नये हेही महत्वाचं.
काय आहे नेमका शोध?
च्युइंगम खाल्ल्यानं कोरोना रोखता येतो किंवा टाळता येतो हा शोध लावलाय अमेरीकेच्या पेनिसिल्वहानिया विद्यापीठातल्या संशोधकांनी. त्यांचा असा दावा आहे की, च्युइंगम खात असताना 95 टक्के विषाणू तोंडातच अडकतात, ट्रॅप होतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग प्रसार होत नाही. कोरोना होण्याच्या शक्यता कमीत कमी होत जातात. कोरोना हा लाळेतून, शिंकेतून प्रसारीत होतो यावर तर आता जगाचं एकमत झालंय. त्या लाळेच्याविरोधात च्युइंगम एखाद्या जाळीचं काम करतो आणि त्यातून कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखला जातो असं संशोधकांना वाटतं. च्युईंगममध्ये एससीई-2 प्रोटीन असतात जे पेशीच्या मुळापर्यंत जातात. कोरोनाचा विषाणूही पेशीमध्ये जातो पण तो एससीई-2 मध्ये मिसळतो. त्यातून जो लोड तयार होतो, त्याला च्युईंगम रोखतो. सर्वात महत्वाचं म्हणजे हे च्युइंगम अजून बाजारात आलेलं नाही. त्यामुळे कोरोना होऊ नये म्हणून लगेच च्युइंगम खरेदी करण्याचा विचार करत असाल तर घाई करु नका.
An experimental chewing gum containing a protein that “traps” coronavirus particles could limit the amount of virus in saliva and help curb transmission when infected people are talking, breathing or coughing, researchers believe. https://t.co/LkcbQKL4su
— Inquirer (@inquirerdotnet) November 23, 2021
प्रयोगावर सवाल
अमेरीकन संशोधकांनी कोरोनाच्या विरोधात हे नवं शस्त्र शोधलं असलं तरी ते अजूनही प्राथमिक स्वरुपात आहे. त्यामुळे त्यावर अनेक सवालही उपस्थित केले जातायत. एका विशिष्ट स्वरुपाचं च्युइंगम डेव्हलप करुन कोरोनाच्याविरोधात ते वापरलं गेलं, त्याचं निकाल चांगले आलेत. पण एका लॅबमध्ये हा प्रयोग केला गेला, तिथलं वातावरण आणि इतर गोष्टी वेगळ्या आणि लॅब बाहेरचं वातावरण, व्यक्ती वेगळे. बरं हा प्रयोग सध्या मनुष्यासारख्या मशिनवर केला गेलाय. अजून प्रत्यक्ष व्यक्तीवर केला गेलेला नाही. त्यामुळेच मानवी शरीराचं तापमान, इतर गोष्टींवर हे नवं च्युइंगम शस्त्र कसं काम करतं यावर सविस्तर परिक्षण बाकी आहे. च्युइंगम हे तोंडाचे, दाताचे आजार रोखण्यात यशस्वी होतं हे खरं आहे. पण कोरोनासारख्या त्यातही ओमिक्रॉनसारख्या संकटावर किती प्रभावी ठरेल याबाबत अजून तरी साशंकताच व्यक्त केली जातेय. पण म्हणून निराश होण्याचं कारण नाही. कारण एक छोटीशी शक्यताच मोठ्या संकटाच्याविरोधात लाटेसारखी उभी राहू शकते. त्यामुळेच अमेरीकन प्रयोगाकडं त्याच दृष्टीकोनातून पहायला हवं.
हे सुद्धा वाचा: