मुंबई: एक ऑप्टिकल भ्रम लोकांना विचार करण्यास भाग पाडत आहे. हे आपल्या मेंदूला आव्हान देते आणि आपल्या डोळ्यांची परीक्षा घेते. या गोंधळात टाकणाऱ्या भ्रमात दोन घोडे आहेत की एक घोडा आहे हे कोणालाही सहजासहजी समजत नाही. उजव्या आणि डाव्या दोन्ही भागांतील चित्र पाहिलं तर एक घोडा आहे की दोन हे कळणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रात दिसणारं घोड्याचं डोकं नेमकं कोणत्या घोड्याचं आहे तेच कळत नाहीये. हे चित्र नीट बघा आणि याचं उत्तर सांगा.
प्रथमदर्शनी या चित्रात दोन घोडे आहेत. बारकाईने निरीक्षण केल्यास एक विचित्र वैशिष्ट्य दिसून येते – घोड्याचे डोके दिसते. पण हे डोके इतके गोंधळात टाकणारे आहे की आपण हे चित्र पाहताच गोंधळून जातो. आपल्या डोळ्यांना काही समजत नाही. आता नेमकी हे डोकं कोणत्या घोड्याचं आहे असा प्रश्न पडतो.
आम्ही तुम्हाला सांगतो की याचं उत्तर कसं शोधायचं. या चित्रात दोन घोडे दिसतायत. एक डोकं पण आहे जे नेमकी पहिल्या घोड्याचं आहे की दुसऱ्या हे शोधायचं आहे. आता या दोन्ही घोड्याचे पाठीवरील केस तुम्हाला या चित्रात दिसून येतील. डोक्याचे आणि पाठीचे केस जिथे सारख्या रंगाचे असतील ते डोकं त्या घोड्याचं. म्हणजेच घोड्याच्या डोक्यावर काळ्या रंगाचे केस आहेत, ज्या पाठीवर काळ्या रंगाचे केस आहेत त्याच घोड्याचं हे डोकं असणार! 2 नंबरच्या घोड्याचं हे डोकं आहे कारण पहिल्या घोड्याच्या केसांचा रंग वेगळा आहे.