मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात नाजिया नसीम नावाची स्पर्धक तब्बल 1 कोटी रुपये जिंकली. विशेष म्हणजे कौन बनेगा करोडपतीच्या या सीझनमध्ये 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या नाजिया या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहेत. नाजिया 1 कोटी जिंकल्याच्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर बुधवारी (11 नोव्हेंबर) रात्री ‘सोनी’ वाहिनीवर प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमात नाजिया करोडपती बनल्याचं प्रेक्षकांना बघायला मिळालं (Who is KBC 12 first crorepati contestant Nazia Nasim).
नाजिया यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं, तर त्या ग्रूप मॅनेजर असून गुरुग्राम येथे त्यांचं कार्यालय आहे. नाजिया यांनी कार्यक्रमात सांगितलं की, सध्या त्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांचं मुळ गाव झारखंडच्या रांची जिल्ह्यातील डोरंडा पारसटोली आहे. त्यांचे पती शकील हे एक जाहीरात कंपनी चालवतात.
नाजिया आणि शकील यांना एक दहा वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या वडिलांचं नाव मोहम्मद नसीमुद्दीन असं आहे. ते स्टील अॅथोरिटी ऑफ इंडिया येथे कार्यरत होते. मात्र, आता ते निवृत्त झाले आहेत. नाजिया यांना एक मोठी आणि एक लहान बहीण आहे. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण रांची येथे झालं. त्यानंतर दिल्लीच्या IIMC येथे त्यांनी मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं.
नाजिया यांनी कार्यक्रमात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांबद्दल ऋण व्यक्त केलं. यावेळी त्या भावनिक झाल्या.
“वडिलांनी माझं शिक्षण केलं त्यामुळेच आज मी केबीसीच्या सेटवर पोहोचली. मला अभिमान आहे की, माझे वडील फेमिनिस्ट आहेत. मी फेमिनिस्टची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. मी एका फेमिनिस्टची पत्नी आहे आणि भविष्यात एका फेमिनिस्टची आई असेन”, असं नाजिया कार्यक्रमात म्हणाल्या.
NAZIA NASIM is #KBC12’s first crorepati! Watch this iconic moment in #KBC12 tonight at 9 pm only on Sony TV. @SrBachchan @SPNStudioNEXT pic.twitter.com/iresjFqeeo
— sonytv (@SonyTV) November 11, 2020
हेही वाचा : PHOTO | साताऱ्यात उदयनराजेंचा पराभव करणारे खासदार श्रीनिवास पाटील चक्क शेताच्या बांधावर!