नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील कलांमध्ये भाजपने आघाडी घेतल्यानंतर त्यावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. चंद्र आणि मंगळ ग्रहावर जाणाऱ्या सॅटेलाइटला पृथ्वीवरून नियंत्रित केलं जाऊ शकतं तर ईव्हीएम मशीन का हॅक केल्या जाऊ शकत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी केला आहे. (‘Why can’t they be hacked?’: Congress’ Udit Raj raises questions over EVMs)
उदित राज यांनी ट्विट करून बिहार निवडणुकीवर भाष्य केलं आहे. अमेरिकेत ईव्हीएम मशीन असत्या तर डोनाल्ड ट्रम्प निवडणूक हरले असते काय?, असा सवाल उदित राज यांनी एका ट्विटमधून केला आहे. दुसऱ्या ट्विटमधून त्यांनी ईव्हीएम मशीनचा थेट संबंध चंद्र आणि मंगळ ग्रहाशी जोडला आहे. चंद्र आणि मंगळावर जाताना त्या उपक्रमाची दिशा जर पृथ्वीवरून नियंत्रित केल्या जाऊ शकते तर ईव्हीएम का हॅक केल्या जाऊ शकत नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलला होता. यावेळी त्यांनी ईव्हीएमला ‘एमव्हीएम’ म्हणजे ‘मोदी व्होटिंग मशीन’ असं नाव दिलं होतं.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सध्या भाजपप्रणित एनडीए आघाडीवर दिसत असली तरी येत्या काही तासांमध्ये हे चित्र पुन्हा पालटू शकते. आतापर्यंतच्या माहितीनुसार बिहार विधानसभेच्या 40 जागांवर उमेदवारांमध्ये केवळ 1000 मतांचा फरक आहे. काही जागांवर हा फरक 500 मतांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये महागठबंधन पुन्हा आघाडीवर येईल, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधनने मोठी आघाडी घेतली होती. मात्र, नंतरच्या दोन तासांत हे चित्र संपूर्णपणे पालटले असून आता भाजपप्रणित आघाडीने भक्कम आघाडी घेतली आहे. सध्याच्या घडीला एनडीए जवळपास 127 तर महागठबंधन 104 जागांवर आघाडीवर आहे.
जब मंगल ग्रह &चाँद की ओर जाते उपक्रम की दिशा को धरती से नियंत्रित किया जा सकता है तो ईवीएम हैक क्यों नही की जा सकती ?
— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) November 10, 2020
तर दुसरीकडे बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच.आर. श्रीनिवासन यांनीही निकाल येण्यासाठी संध्याकाळपर्यंतचा अवधी लागेल, असे स्पष्ट केले. बिहारमध्ये आतापर्यंत केवळ 20 टक्के मतांची मोजणी झाली आहे. अजूनही 3 कोटी 10 लाख मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे नेमके चित्र स्पष्ट होण्यास सहा-सात वाजतील, असे एच.आर. श्रीनिवासन यांनी सांगितले.
Bihar Election Result live #BiharElectionResults https://t.co/najJep1Dvb
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2020
संबंधित बातम्या:
Bihar Election Result 2020 | सुशांतसिंह राजपूतचा भाऊ नीरजकुमारला आघाडी की पिछाडी?
(‘Why can’t they be hacked?’: Congress’ Udit Raj raises questions over EVMs)