मुंबई : राष्ट्रवादी खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी साकरलेल्या नथुराम गोडसे ही भूमिका साकरल्यावरून (Why I Killed Gandhi) आता राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत, काही वेळापूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे, अमोल कोल्हे एक गुणवंत कलाकार असल्याची प्रतिक्रिया दिली, तर आता राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेत कलाकारांचा वेष घेऊन गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही, सिनेमाला विरोध करणारच अशी भूमिका घेतल्याने राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतले दोन गट उघड झाले आहेत. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा 45 मिनिटाचा सिनेमा आहे. तो प्रदर्शित होत आहे असं मला समजलं. अमोल कोल्हे आज मला भेटले. तासभर आमची चर्चा झाली. ते पुण्यात एक प्रकल्प राबवत आहे. त्यावर चर्चा झाली. त्यांनी मला एक क्लिप दाखवली. त्यात ते गोडसेची भूमिका साकारत आहेत. अमोल कोल्हेंची खरी ओळख ही अभिनेता म्हणून आहे. ते लोकप्रिय आणि गुणी अभिनेते आहेत. अभिमान वाटावा असे कलाकार आहेत. त्यांची संभाजी मालिका सर्वजण पाहात असतात. अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. गोडसेंचा रोल केला असला तरी अभिनेत्याच्या अँगलने त्याकडे पाहिलं पाहिजे. ते कलावंत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कलेच्या भूमिकेतून पाहा, असं आवाहन टोपे यांनी केलं.
जितेंद्र आव्हाडांची भूमिका काय?
जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत म्हटले आहे की, डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही. विनय आपटे, शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केला, त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 20, 2022
विनय आपटे ~शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 20, 2022
‘कलाकार हा कलाकार, त्याला राजकारणाशी जोडणं योग्य नाही’
‘ते कलाकार आहेत. एक कलाकार आपली कलाकारी त्यांना मिळणाऱ्या रोलवर करतो. त्यांनी देवाचा रोल केला तर तो काही देव होत नाही. हिरो, गुंड, डान्सर किंवा कॉमेडियन असू द्या… कलाकार हा कलाकार असतो. त्याला राजकारणाशी जोडणं योग्य नाही’, असं मत अस्लम शेख यांनी व्यक्त केलं आहे. मात्र आता या चित्रपटावरून राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत एवढ मात्र नक्की, त्यामुळे या चित्रपटाचे भवितव्य काय? हे येणारा काळच सांगेल.