मुंबई : तुम्ही देखील मद्यापान करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. मद्यपान करताना अनेक जण व्हिस्कीला प्राधान्य देतात, पण तुम्हाला माहिती आहे व्हिस्की ग्लासचा तळ मोठा का असतो? यामागचं वैज्ञनिक कारण आता समोर आलं आहे. मद्यपान करताना पहिला हतू नशा करणं असा असतो. जगभरात मद्यपान करण्याच्या वेग-वेगळ्या पद्धती आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी मद्यपान करण्याच्या वेग-वेगळ्या पद्धती का आहेत?
तज्ज्ञांच्या मते, मद्यपान करण्याची सर्वात योग्य ग्लास कसा असावा, याबद्दल एक गोष्ट समोर आली आहे. मद्यपान करताना असा ग्लास हवा ज्यामधून रंग आणि सुगंध अनुभवता येईल. एवढंच नाही, तर मद्य एखाद्या ग्लासमध्ये टाकल्यानंतर तिच्या स्वाभावीक प्रकृतीत बदल झाला नाही पाहिजे.
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, व्हिस्की ज्या ग्लासमध्ये दिली जाते, त्या ग्लासचा तळ मोठा असतो. व्हिस्कीचा उष्णपणा कायम ठेवण्यासाठी ग्लासचा मोठा तळ फयदेशीर ठरतो. ज्यामुळे ग्लासात असलेल्या व्हिस्कीवर कोणताही परिणाम होत नाही.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तापमानाच्या बदलाचा परिणाम व्हिस्कीच्या चवीमध्ये होतो. म्हणून व्हिस्कीचा स्वाभाविक तापमान कायम राहण्यासाठी मोठा तळ असलेल्या ग्लासचा वापर केला जातो. म्हणून व्हाईन तज्ज्ञ ग्लासचा बेस पकडण्यासाठी सांगतात. ज्यामुळे बोटांच्या तापमानामुळे व्हिस्कीच्या तापमानात बदल होत नाही.