ऑस्ट्रिया : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण आहे. याच लग्नाला आणखी खास करण्यासाठी अनेक लोक हटके ट्रिक्स वापरत असतात. यातही विशेष म्हणजे प्रपोज करण्यासाठी भन्नाट युक्त्या हल्लीचे लोक वापरताना दिसतात. असाच एक भन्नाट प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या प्रपोजसाठी एका जोडप्याने अशी पद्धत अवलंबली की त्यानंतर असं काही घडलं की सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण या लग्नाच्या प्रपोजसाठी जोडप्याने थेट जीव धोक्यात घातला. (woman falls from cliff top after marriage proposal saying yes survives after landing snow)
ऑस्ट्रियामधील 27 वर्षीय प्रियकराने त्याच्या 32 वर्षीय प्रेमिकाला प्रपोज करण्यासाठी कॅरिंथियातील (Carinthia) फालकार्ट डोंगरावर ( Falkart mountain ) नेलं. दोघेही यावेळी खूप आनंदाने होते. जेव्हा प्रियकराने लग्नासाठी प्रपोज केला तेव्हा प्रेयलीने लगेचच होकार दिला. पण, लग्नाला मुलगी ‘हो’ म्हणताच तिचा पाय अचानक सरकला आणि जवळजवळ 650 फूट ती खाली पडली.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे प्रेयसी पडताच तिला वाचवण्यासाठी प्रियकरानेही उडी मारली. पण, 50 फूट खाली पडल्यानंतर तो अडकला. त्याच वेळी, मुलगी जमिनीवर पसरलेल्या बर्फावर पडली.
‘दोघांचेही वाचले प्राण’
तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला तरुणी बर्फावर पडलेली दिसली. यानंतर त्याने तात्काळ पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा जीव वाचवला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या –
पत्नीने खोटा साप दाखवून पतीसोबत केला Prank, दरवाजा खोलताच तलावारीने केले वार; VIDEO VIRAL
(woman falls from cliff top after marriage proposal saying yes survives after landing snow)