मुंबई : मुंबईतल्या (Mumbai) एका कोव्हिड केअर सेंटरमध्ये (Covid care centre) महिलेचा विनयभंग (women molestation ) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या कुरार परिसरात असणाऱ्या पठाणवाडी जंक्शनजवळ डीएनए या खाजगी हॉस्पिटलमधल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये सुरक्षारक्षकाकडून विवाहितेचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (women molestation at Mumbai Covid Center security guard remanded in police custody for one day)
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश कोचेवाड (21) असं विनयभंग केलेल्या सुरक्षारक्षकाचं नाव आहे. सुरेशवर कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला कुरार पोलिसांकडून अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ज्याची सुरक्षारक्षक म्हणून निवड करण्यात आली त्याने विनयभंग केल्याने महिलांमध्ये संतापाचं वातावरण आहे. तर महिला कुठल्याच क्षेत्रात सुरक्षित नाही. मुंबईसारख्या शहरांमध्ये जर रुग्णालयात असे प्रकार घडत असतील तर महिलेच्या सुरक्षेचं काय असा सवाल यातून उपस्थित होतो.
दरम्यान, याआधीही असाच एक प्रकार पुण्यातून समोर आला होता. पुण्यातल्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घडली होती. या प्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.
एका 25 वर्षीय महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या ठिकाणच्या दोन डॉक्टरांनी या महिला डॉक्टराचा विनयभंग केल्याचं समोर आलं होतं. योगेश भद्रा आणि अजय बागलकोट अशी विनयभंग करण्या दोन्ही डॉक्टरची नावं आहेत. गेल्या एका महिन्यापासून हे दोन्ही डॉक्टर त्या महिलेला उद्देशून अश्लील बोलत होते. काही दिवस त्या महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर त्या दोघांनी तिला जास्त प्रमाणात त्रास देण्यास सुरुवात केली असं महिलेनं तक्रारीत म्हटलं होतं.
इतर बातम्या –
पिंपरीत पोलिसासोबत जीवघेणा प्रकार, गाडी रोखली म्हणून पोलिसाला बोनटवर बसवून सुसाट प्रवास
एका वर्षात 1 लाखाचे झाले 9 लाख रुपये, या गुंतवणुकीत मिळाला बंपर रिटर्न
VIDEO : Tuljapur | आमचेच लोक आमचे शत्रू झाले – गुरप्रितसिंग सोखी pic.twitter.com/4mUKymvpNM
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
(women molestation at Mumbai Covid Center security guard remanded in police custody for one day)