नवी दिल्ली : WWE च्या रिंगणात मातब्बर पहिलवाणांना धूळ चारणारा द ग्रेट खली आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. खलीने आज दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने कृषी कायद्यासह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी खलीने केली आहे (Wrestler great Khali on Farmers protest).
“मी माझ्यासोबत सहा महिन्यांचं अन्नधान्य आणलं आहे. केंद्र सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मी परत जाणार नाही”, अशी रोखठोक भूमिका खलीने मांडली.
खलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो शेतकऱ्यांचा समस्या मांडत आहे. “शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने अन्नधान्य विकत घेतलं जात आणि सर्वसामान्य नागरिकांना ते 200 रुपयांमध्ये विकलं जातं. त्यामुळे सर्वसामान्य गरीब, होतकरु मजुरांचं प्रचंड नुकसान होतं”, असं खली म्हणाला.
“सर्वांनी शेतकऱ्यांसोबत उभं राहावं, जेणेकरुन केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मजबूर होईल”, अशी विनंती खलीने केली. त्याचबरोबर “सरकारची गाठ आता पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांसोबत आहे. मी सहा महिन्यांचं राशन सोबत घेऊन आलो आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथेच ठाण मांडून राहणार”, असा इशारा खलीने दिला आहे (Wrestler great Khali on Farmers protest).
किसानो का साथ देने आये #द_ग्रेट_खली ! काफिला बढ़ता ही जा रहा है ! जय जवान जय किसान ! pic.twitter.com/LIgCT8MnZi
— AMIT KUMAR (@AMITKUM930) December 2, 2020
संबंधित बातम्या : जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा रोखणार नाही, तरी आंदोलन 26 जानेवारीपर्यंत सुरु ठेवू, शेतकरी नेत्याचा इशारा