मुंबई : विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. Cancel Final Year Exams असे या ऑनलाईन याचिकेचे नाव आहे. या याचिकेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. (YuvaSena Online Petition For Cancel Final Year Exams )
युवासेनेने Change.org या वेबसाईटवर ही ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. या याचिकेला आतापर्यंत 1 लाख 65 हजार 374 जणांनी प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा दिवसेदिंवस वाढत चालला आहे. असे असतानाही केंद्रीय गृहमंत्रालयाने सप्टेंबर महिना अखेरपर्यंत परीक्षा घ्या, असे आदेश केंद्राच्या उच्च शिक्षण सचिवांना दिले आहेत. तर दुसरीकडे युजीसीच्या समितीनेही परीक्षा घेतल्या पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे. या निर्णयाला शिवसेनेच्या युवा सेनेकडून विरोध करण्यात आला आहे.
In less than 24 hours we have got 1,50,000+ signatures on our petition!!
Keep sharing, keep spreading!
Lets make our voice heard.
Wakeup @ugc_india !https://t.co/5ZMP7TbXoC#SayNoToUGCGuidlines #StudentLivesMatter @AUThackeray https://t.co/quA09NDH8X— Varun Sardesai (@SardesaiVarun) July 8, 2020
युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. (YuvaSena Online Petition For Cancel Final Year Exams )
“यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवा सेनेने आवाज उठवला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात खूप मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे”, असं वरुण सरदेसाई म्हणाले आहेत. त्याचबरोबर “विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीवाशी विद्यापीठ खेळत आहे”, असा आरोपदेखील युवा सेनेकडून करण्यात आला आहे.
हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
“यूजीसीने सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतल्या, या परीक्षादरम्यान कम्युनिटी ट्रान्समिशन झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार?”, असा सवाल त्यांनी केला.
“यूजीसीने विद्यापीठांना परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेण्याची मूभा दिली आहे. पण ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नाही. याशिवाय तेथील विद्यार्थ्यांसाठी हवी ती साधनसामग्री नाही. त्यामुळे या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जातील”, असं वरुण सरदेसाई म्हणाले. (YuvaSena Online Petition For Cancel Final Year Exams )
Yuva Sena requests HRD Minister @DrRPNishank Ji to reconsider @ugc_india ‘s decision of compulsorily conducting final year exams.
We have also raised concerns on behalf of students and education fraternity.
Hope these are addressed as well. @AUThackeray pic.twitter.com/xrgIk3UmU0— Varun Sardesai (@SardesaiVarun) July 7, 2020
संबंधित बातम्या :
विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यास अनुमती, केंद्रीय गृहमंत्रालयाचं शिक्षण विभागाला पत्र
UGC चा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा, सप्टेंबरपर्यंत परीक्षा शक्य नाही : उदय सामंत