मुंबई : आजकाल केस गळण्याची समस्या खूप सामान्य आहे. केस गळतीचे मुख्य कारण चुकीचा आहार, खराब जीवनशैली आहे. परंतु कधीकधी फॅशन आणि स्टाईलच्या नादात देखील केस गळतीची समस्या निर्माण होते. सुरूवातील केस गळतीकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, जेंव्हा केस गळती जास्त होते, त्यावेळी केस गळती रोखण्यासाठी आपण उपाय करतो. (These are the main causes of hair loss)
-आपण आपले केस जितके नैसर्गिक ठेवता तितके चांगले आहे. पण स्टायलिश दिसण्यासाठी मुली अनेक प्रयोग केसांवर करतात. केस मऊ करणे, सरळ करणे, केराटीन ट्रीटमेंट इ. हे सर्व करण्यासाठी केसांवर विविध रसायने वापरली जातात. यामुळे हळूहळू केस निर्जीव आणि कोरडे होतात.
-फॅशनमुळे अनेकजण केसांना तेल लावत नाही. परंतु लक्षात ठेवा ज्याप्रमाणे आपल्याला पोट भरण्यासाठी खाण्याची गरज असते त्याचप्रमाणे केसांनाही वेळोवेळी तेलाची आवश्यकता असते. यामुळे केसांना पोषण मिळते. केसांना तेल न लावल्यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात.
-तुमच्या नियमित खाण्या-पिण्याच्या सवयीमुळेही केस गळतात. बाहेरील तेलकट, फास्ट फूट यासारखे अनेक पदार्थांचे शरीराप्रमाणे केसांवरही विपरित परिणाम होतो. तुमच्या रोजच्या जेवणात प्रोटीन आणि आयन या घटकांची कमी असेल तर केस गळतीचे प्रमाण वाढते.
-केस गळतीचे कारण तुमची केस विंचरण्याची पद्धतही असू शकते. काही जण केसांचा गुंता झाल्यास केस विंचरताना ते खेचतात. त्यामुळे ते तुटतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, केस विंचरताना ते आरामात विंचरा, त्यांना मुळापासून ओढू नका. यामुळे केस कमजोर होऊन ते तुटतात.
-काही जण सर्दी, पडसं, अंगदुखी यासारख्या छोट्या छोट्या दुखण्यासाठी गोळ्या खातात. गोळ्यांच्या अतिसेवन केल्यानेही केस गळतीचे प्रमाण वाढते. तणाव, हृदयासंबंधीचे आजार, उच्च रक्तदाब या गोळ्यांच्या सेवनाने केस गळतीच्या समस्या वाढतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!
Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(These are the main causes of hair loss)