Nithin Kamath success Story : व्यवसाय किंवा करिअरमध्ये जर प्रगती करायची असेल तर परिश्रम करावे लागतात. चौकटीच्या बाहेर विचार करावा लागतो. जेणेकरुन काहीतरी नवीन करता येते. देशातील सर्वात मोठे ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Zerodha चे CEO आणि सह-संस्थापक नितीन कामत यांची सक्सेस स्टोरी आज आपण पाहणार आहोत. ज्यांनी व्यवसायात प्रगती तर केलीच पण अफाट पैसा देखील कमवला. त्यांनी आज 50 हजार कोटींची कंपनी तयार केली आहे.
नितीन कामत यांनी त्यांची प्रेमकहाणी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 20 वर्षांपूर्वी त्यांची भेट सीमा पाटील यांच्यासोबत झाली होती. त्या एका कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या. येथेच रात्रीच्या शिफ्टमध्ये त्यांची भेट झाली आणि पुढे दोघे लग्नाच्या बंधनात अडकले.
नितीन कामत सांगतात की, आज याच नातेसंबंधामुळे आपणि जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे त्यांनी यश मिळवले आणि कॉल सेंटरच्या नोकरीपासून ते 50 हजार कोटी रुपयांच्या कंपनीपर्यंतचा प्रवास केला.
नितीन कामत यांनी म्हटले की, कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो. त्यामुळे सामंजस्यानेच नाते दृढ आणि अतूट होते. पण अनेकवेळा किरकोळ मतभेदांमुळे लोक नातं तोडतात.
त्यांनी लिहिले आहे की, लोकं आता दीर्घकालीन नातेसंबंधांचे महत्त्व विसरले आहेत. जे वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहे.
नितीन कामत यांच्या मताशी तुम्ही देखील सहमत असाल. ते म्हणतात की किरकोळ नाराजीमुळे नाते तोडून दुसऱ्यासोबत जगण्याचा निर्णय घेण्यापेक्षा तडजोड करुन त्याच जोडीदारासोबत राहा. कारण आपल्याला एकमेकांच्या गरजा आणि इच्छा कळालेल्या असतात. ते जर समजून घेतल्या तर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जोडीदार बदलून स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. उलट काहीवेळा अडथळे निर्माण होतात.