रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘कैरीचे पन्हे’ जबरदस्त फायदेशीर, वाचा !

| Updated on: Apr 19, 2021 | 9:48 AM

संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत आहे. सध्या देशामध्ये 2 लाखांहून अधिक कोरोनाचे रूग्ण आहेत आणि अनेकजन या कोरोनामुळे मरत देखील आहेत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कैरीचे पन्हे जबरदस्त फायदेशीर, वाचा !
Follow us on

मुंबई : संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत आहे. सध्या देशामध्ये 2 लाखांहून अधिक कोरोनाचे रूग्ण आहेत आणि अनेकजन या कोरोनामुळे मरत देखील आहेत. दररोज येणारी कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहूण धक्काच बसत आहे. प्रत्येकजन कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे. (Aam panna are extremely beneficial for boosting the immune system)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक स्पेशल रेसिपी सांगणार आहोत. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. सध्याचे हवामान पाहता रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कैरीचे पन्हे हा एक उत्तम पर्याय आहे. बाजारात कैरीची आवक वाढली असून अनेक घरात कैरीचे पन्हे तयार करण्यात येत आहे. एक ग्लास कैरीचे पन्हे आपल्याला बरेच फायदे देते.

कैरीचे पन्हामध्ये व्हिटॅमिन ए, जीवनसत्त्वे बी -1 आणि बी -2, व्हिटॅमिन सी, लोह, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोलेट, कोलिन आणि पेक्टिन सारख्या घटक आढळतात. यामुळेच या कोरोनाच्या काळात कैरीचे पन्हे पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. कैरीच्या पन्ह्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नियमितपणे कैरीचे पन्ह्याचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती अधिक चांगली होते, ज्यामुळे आपल्या शरीरास अनेक प्रकारच्या आजारांशी लढता येते.

कैरीचे पन्हे घरी तयार करण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही. कैरीचे पन्हे तयार करण्यासाठी कच्ची कैरी, पुदीना, साखर, काळे मीठ आणि भाजलेली जिरेपूड आवश्यक आहे. कैरीचे पन्हे बनवण्यासाठी प्रथम कच्च्या कैरीची साल काढा आणि कैरीमधील कोया काढा. आता कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या होऊपर्यंत शिजू द्या. शिजवलेल्या कैऱ्या चांगल्या मॅश करून त्यात पुदीना चटणी, साखर, काळे मीठ आणि भाजलेली जिरे पूड घाला. आपले कैरीचे पन्हे तयार आहे. दररोज कमीत-कमी एक ग्लास दिवसातून कैरीचे पन्हे पिले तर आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Aam panna are extremely beneficial for boosting the immune system)