Love Affair | 400 पुरुषांकडून प्रपोज पण अजूनही ‘ती’ सिंगल का?, 18 ते 21 वयोगटातील मुलांना फक्त माझ्याशी….

| Updated on: Nov 11, 2023 | 2:04 PM

400 पुरुषांनी प्रपोज केला. पण तिने सगळ्यांनाच नकार का दिला? ती दिसायला सुंदर आहे. पण तिला अजून खर प्रेम का मिळत नाहीय?. तिने सोशल मीडियावरही राग व्यक्त केला. सोशल मीडिया एका दिवस खऱ्या प्रेमाला संपवून टाकेल असं तिला वाटतं.

Love Affair | 400 पुरुषांकडून प्रपोज पण अजूनही ती सिंगल का?, 18 ते 21 वयोगटातील मुलांना फक्त माझ्याशी....
Fran Sawyer still single after getting 400 marriage proposals
Follow us on

नवी दिल्ली : असं म्हणतात, आजच्या काळात खर प्रेम मिळणं खूप कठीण आहे. सोशल मीडियाच्या या जमान्यात लोकांना टाइमपास प्रेमच मिळतय. जे काही महिने किंवा काही वर्षच टिकतं. त्यानंतर दोघे वेगवेगळा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे काही मुला-मुलींचा खऱ्या प्रेमाचा शोध वर्षानुवर्ष सुरु राहतो. त्याना मनासारखा जोडीदार मिळत नाही. सध्या अशाच एका महिलेची चर्चा आहे. वयाच्या 55 व्या वर्षी ती खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. तिचा शोध अजूनही संपलेला नाहीय. असं नाहीय की, तिच्या आयुष्यात यायला कोणी तयार नाहीय. तिला आतापर्यंत शेकडो प्रपोज आलेत. पण अजूनही ती सिंगलच आहे.

फ्रान सॉयर (Fran Sawyer) या महिलेच नाव आहे. तिचा घटस्फोट झालाय. मिररच्या रिपोर्ट्नुसार फ्रानच्या म्हणण्यानुसार, तिला आतापर्यंत 400 पेक्षा जास्त पुरुषांनी लग्नासाठी प्रपोज केलाय. तिने सगळ्यांना नकार दिला. तिने सांगितलं की, तिला प्रपोज करणाऱ्यांमध्ये 18 वर्षाच्या मुलापासून 35-40 वयोगटातील पुरुष आणि वृद्ध व्यक्ती सुद्धा आहेत. 18-21 वयोगटातील मुलांना फक्त माझ्याशी संबंध बनवायचे होते. त्यांच्यात प्रेमाची कुठली भावनाच नव्हती, असं फ्रानने सांगितलं.

पुरुषांच्या बोलण्यावरुनच लक्षात येतं की….

मिस्टर राइटला शोधण्यासाठी फ्रानने अनेक ऑनलाइन डेटिंग एप्सचा सुद्धा वापर केलाय. पण त्याचा काही फायदा झाला नाही. सुरुवातीला सगळेच पुरुष व्यवस्थित बोललात. पण काही दिवसातच त्यांचे हाव-भाव बदलून जातात. पुरुषांच्या बोलण्यावरुनच लक्षात येतं की, त्यांना दीर्घकाळासाठी रिलेशनशिप ठेवण्यात रस नाहीय. त्यांना फक्त टाइमपास करायचा आहे. त्यामुळे फ्रानला रिलेशनशिपमधून माघार घ्यावी लागते.

‘सोशल मीडिया एका दिवस खऱ्या प्रेमाला संपवून टाकेल’

सोशल मीडियावर मुलींशी, महिलांशी कसं बोलायचं, त्यांच्याशी कसं वागायच हे बहुतांश पुरुषांना कळतच नाही, असं फ्रानने सांगितलं. तिने सोशल मीडियावरही राग व्यक्त केला. सोशल मीडिया एका दिवस खऱ्या प्रेमाला संपवून टाकेल असं फ्रानला वाटतं. कारण सोशल मीडियावर लोकांना कोणाच्याही भावनांची फिकीर नाहीय.