मुंबई: जाड आणि सुंदर केस कोणाला नको असतात? म्हणूनच आम्ही तुमचे केस गुळगुळीत आणि चमकदार करण्यासाठी कोरफड-दही हेअर मास्क घेऊन आलो आहोत. कोरफडमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या केसांना पूर्ण पोषण देण्यास मदत करतात. कोरड्या टाळूची समस्या केसांमध्ये कोरफडीच्या वापराने दूर होऊ शकते. त्याचबरोबर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास उपयुक्त ठरते. इतकंच नाही तर यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीनही मिळतं, त्यामुळे तुमचे केस मजबूत होतात, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तर हा हेअर मास्क लावल्याने तुमच्या केसांनाही चमक आणि स्निग्धता येते, तर चला जाणून घेऊया कोरफड-दही हेअर मास्क कसा बनवावा.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)