मुंबई : सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याबरोबरच त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण याच काळात आपली त्वचा तेलकट आणि कोरडी होते. लाॅकडाऊनमध्ये आपण पार्लरमध्ये देखील जाऊ शकत नाहीत. यासाठी आपण घरगुती उपचार करून आपली त्वचा तजेलदार आणि सुंदर करू शकतो. आज आम्ही तुम्हाला एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. (Aloe vera, turmeric and honey face pack are beneficial for the skin)
कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. कोरफडमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. फोरफडचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे ताजी कोरफड, हळद, मध आणि एक चमचा लिंबाचा रस लागणार आहे. सर्वात अगोदर कोरफडमध्ये हळद, मध आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि पेस्ट तयार करा, त्यानंतर पेस्ट काही वेळ फ्रीसमध्ये ठेवा आणि चेहऱ्याला लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा कोरफडचा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे.
कोरफड जेलमध्ये थोडीशी साखर आणि लिंबाचा रस मिसळून त्याचा स्क्रब तयार करू शकता. हा स्क्रब त्वचेवरील डेड स्कीन तर काढतोच आणि त्वचेलाही हायड्रेट ही करतो. यामुळे तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि स्वच्छ होते. याशिवाय कोरफडाच्या रसात थोडेसे नारळाच्या तेलाचे थेंब घालून ते गुडघे, टाचा आणि हाताच्या कोपराला लावल्यास काळेपणा दूर होतो. ही वनस्पती केसांच्या मुळातील पीएच घटकाचे संतुलन कायम राखण्यास मदत करते.कोरफडाने केस गळणे थांबते, केसांची वाढ चांगली होते, केसांतील कोंडा जातो, स्कॅल्पच्या समस्या दूर होतात आणि केसांचे चांगले पोषणही होते.
कोरफडीत मुबलक प्रमाणात ‘ई’ जीवनसत्व आढळते. त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती औषध ठरते. फुटलेल्या ओठांवर कोरफड जेल लावल्यास ओठ मुलायम होतात. कोरफड जेलमध्ये थोडेसे ऑलिव्ह तेल मिसळून लिप बामसारखे देखील वापरू शकता. सकाळी उठल्यावर डोळे सुजलेले आणि थकल्यासारखे जाणवत असल्यास कोरफडीचे पान मध्यभागी कापून डोळ्यावर ठेवल्यास आराम वाटेल. डोळ्यांच्या भोवती कोरफड जेल लावल्यास काळीवर्तुळे नाहीशी होतात. कित्येक अंडर आय क्रीम्समध्ये देखील कोरफडीचा वापर केला जातो.
(टीप – कोणत्याही वैद्यकीय, आयुर्वेदिक सल्ल्याचं पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Aloe vera, turmeric and honey face pack are beneficial for the skin)