काय गं कांदा चिरतेय का…असा आवाज तुम्हाला नेहमी ऐकायला मिळतो ना. कांदा (onions) हा कठोरातील कठोर माणसालाही रडवतो. कांदा हा चिरणाऱ्याच्या (chopping) डोळात पाणी आणतो. सोबत घरातील इतर लोकांच्या पण डोळ्यात अश्रू (tears) येतात. कांदात असलेल्या गुणधर्मामुळे हे घडतं. कांदा हा पदार्थाची चव वाढतो. कांदा हा जेवण्यातील एकदम खास पदार्थ. कुठलाही पदार्थ हा कांदाशिवाय पूर्ण होत नाही.
भाजी करण्यासाठी रोज एक तरी कांदा चिरावा लागतो. अनेकांना ताटात चिरलेला कांदा लागतो. पण हो कांदा चिरण्याची मात्र कोणालाही आवड नसते. कांदा चिरण्यासाठी बाजारात अनेक उपकरण आली आहे. पण प्रत्येक वेळी हे उपकरण वापरणं शक्य नसतं. कांदा चिरताना वाटणारी भीती आज आम्ही घालवणार आहोत. मग अशावेळी काय केलं तर आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही. या काही खास टीप्स वापरा आणि कांदा चिरण्याची भीती घालवा.
कांदा तुम्हाला कधी नाही रडवणार
1. स्वयंपाक करण्याच्या 2 ते 3 तासापूर्वी कांदाला फ्रीजमध्ये ठेवा.
2. कांदा चिरण्यापूर्वी काही वेळासाठी त्याला विनेगरमध्ये ठेवावे.
3. कांदा चिरताना तो मुळाच्या बाजूने चिरावा.
4. कांदा चिरताना धारदार चाकूने चिरावा. त्यामुळे कांदा पटकन चिरल्या जाईल आणि तुमच्या डोळ्यात अश्रू येणार नाही.
5. कांदा चिरताना ज्या चाकूचा वापर होणार आहे त्याला लिंबूचा रस लावा.
6. कांदा चिरताना सीटी वाजवा. सीटी वाजवताना तोंडातून हवा निघते. या हवेमुळे कांदातून निघणाऱ्या एंजाइम तुमचापर्यंत येत नाही. तुमच्या डोळ्यात अश्रू येणार नाही.
7. कांदा चिरताना मेणबत्ती लावा. कांदातून निघणारी गॅस ही मेणबत्तीकडे जाईल.
8. कांदा चिरताना तोंडात ब्रेडचा तुकटा खात राहा.
9. कांदा चिरण्यापूर्वी उन्हात ठेवावा.
10. कांदा चिरण्यापूर्वी तो थोड्यावेळ पाण्यात ठेवावा.
कांदा का रडवतो?
कांदामध्ये असे काही गुणधर्म आहेत ज्यामुळे कांदा चिरताना आपल्या डोळ्यात पाणी येतं. कांदात डोळ्यातून अश्रू आणणारे रसायन असते. कांद्याच्या एका रेणूत 6 कार्बन, 12 हायड्रोजन आणि 2 गंधकाचे अणू असतात. अमिनो, सल्फोक्सिड आणि अनजाईम अॅसिडपासून सल्फोनिक अॅसिड तयार होतं. आणि ते हवेत पसरतं. या अॅसिडमुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं.
एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे एका विदेशी कंपनीने एक भन्नाट उपाय काढला आहे. कांदा चिरताना लावण्यासाठी चष्मा काढला आहे. एडिंग्टन असं या कंपनीचं नाव आहे. Onion Goggles असं म्हणतात. कांदा चिरताना हा चष्मा वापरल्यास तुमच्या डोळ्यातून पाणी येत नाही. या टीप्सचा वापर करा आणि कांदा तुम्हाला रडवणार नाही.
नोट – या बातमी माहितीच्या आधारावर आहे. कुठल्याही वैज्ञानिक पुरावा नाही.
संबंधित बातम्या :
तुम्हीही फ्रिजमधील पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा… समोर आले गंभीर परिणाम