मुंबई : काद्यांची पात आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मुळात हिरव्या भाज्याच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कांद्याची पात खायला चवदार आहेत शिवाय तिच्यात अनेक पौष्टिक तत्वे देखील आहेत. जी तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. कांद्याच्या पातीमध्ये कार्बोहाइड्रेट्स, विटामिन सी, प्रोटीन, फॉस्फोरस, सल्फर आणि कॅल्शियम असते. त्याचप्रमाणे यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे काद्यांची पात खाल्लाने तोंडाची दुर्गंधी दूर होते. काद्यांची पात खाल्लांने तुमची दृष्टी वाढते आणि मोतीबिंदूची लक्षणे कमी होतात. (Amazing benefits of onion leaves)
कांद्याची पात खाण्याचे फायदे
कांद्याची पात खाल्लाने तुमच्या तोंडातून येणारा वास कमी होतो. शिवाय बद्धकोष्ठता देखील दूर होते आणि अॅसिडिटीची समस्या कमी होते. जर आपल्या पोटात जळजळ होत असेल तर कांद्याची पात खाल्लाने आराम देखील मिळतो. हे हृदयरोगामध्येही खूप उपयुक्त आहे. सर्व प्रकारच्या हंगामी रोगांमध्ये आपल्याला या भाजीचा फायदा होतो. कांद्याची पात आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी कमी करते. मोठ्या आंतड्याच्या कर्करोगापासून मुक्त होण्याशिवाय कांद्याची पात उपयुक्त आहे.
रक्तातील साखरेची पातळी कमी करते
कांद्याची पातमध्ये ओनियन्स सल्फर असल्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. सल्फर संयुगे शरीरात इन्सुलिन तयार करण्याची क्षमता वाढवतात. आपल्या मधुमेह रोखण्यासाठी हे बर्याच प्रमाणात प्रभावी आहे.
पचन सुधारते
कांद्याची पातीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. कांद्याची पाती आपण कशीही खाऊ शकतो त्याची भाजी करून खावे असे काही नाही. आपण कांद्याची पात कच्चीही खाऊ शकतो.
संबंधित बातम्या :
Food | मेंदूवरचा ताण कमी करा, ‘या’ भाज्या खा आणि स्मरण शक्ती वाढवा!
Health | आरोग्यासह केसांवरही कोरोनाचा गंभीर परिणाम, संशोधनादरम्यान तज्ज्ञांचा खुलासा!
(Amazing benefits of onion leaves)