मुंबई : आवळा आपल्या आरोग्यासह आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आवळा हे असे सुपर फूड आहे, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे तुमची पचनशक्ती देखील बळकट होईल. तसेच तुम्हाला हे माहिती आहे का? की, आवळ्याचा ज्यूस आपण दररोज पिलातर आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते. (Amla juice is beneficial for weight loss)
तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर आवळ्याचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. आवळा हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतो. आवळा शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करून चांगलं कोलेस्ट्रॉल तयार करण्याचं काम करतो. जर पोटात होणाऱ्या समस्या जसं, जळजळ, गॅस यांसारख्या समस्याही दूर करतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा आवळ्याचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. आवळा डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठीही मदत करतो.
रोज आवळा खाल्ल्याने आपला चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो. त्यामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडेंट त्वचेच्या वृद्धत्वाची समस्या कमी करतात. रस पिण्यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी होतात. हे शरीराला डिटॉक्स करण्याचे कार्य देखील करते. ज्या लोकांची हाडे कमकुवत आहेत, त्यांनी आवळा रस सेवन केला पाहिजे. हा रस आपली हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करते.
हिवाळ्याच्या दिवसांत गरम चहा प्यावा असे सर्वांनाच वाटत असते. अशावेळी चहात आवळ्याचा वापर करुन पाहा. एक आवळा, आले आणि दालचिनी टाकून हा चहा बनवू शकता. या सर्व गोष्टी आपल्या शरीराला आतून उबदार ठेवतील. यासाठी चहा बनवण्याच्या भांड्यात अर्धा चमचा किसलेले आले, अर्धा तुकडा दालचिनी, 1 चिरलेला आवळा आणि थोडासे पाणी घालून साधारण 10 मिनिटे उकळवा. या चहात चवीनुसार किंवा अर्धा चमचा गूळ घालू शकता.
(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | हेल्दी आणि चमकदार त्वचेसाठी ‘या’ सवयी गरजेच्या!https://t.co/gB4ZfQIj8t#skincare #skincareroutine #glowingskin
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 9, 2020
(Amla juice is beneficial for weight loss)