कोरोना काळात फळं आणि भाज्या धुवून घेताय, थांबा ही बातमी वाचा…

| Updated on: May 02, 2021 | 10:02 AM

वाढत्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी लाॅकडाऊन लावण्यात आले आहे.

कोरोना काळात फळं आणि भाज्या धुवून घेताय, थांबा ही बातमी वाचा...
फळ आणि भाज्या
Follow us on

मुंबई : वाढत्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. यासर्व परिस्थितीमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेत कोरोनापासून दूर राहणे सर्वात महत्वाचे झाले आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपण सर्वजण हेल्दी आहार आणि व्यायामावर अधिक भर देत आहोत. हेल्दी आहारामध्ये जास्तीत-जास्त भाज्या आणि फळे देखील आहारात घेत आहोत. (An easy way to wash vegetables and fruits during the Corona period)

जे फळे आणि भाज्या आपण बाजारातून खरेदी करून आणतो. त्याला स्वच्छ धुतले पाहिजे. कारण या सध्याच्या कोरोना काळात बाहेरून काहीही खरेदी करणे अतिशय धोकादायक झाले आहे. फळं धुण्याची सोपी पद्धत वाचा…

कोरोना काळात फळे आणि भाज्या कशा धुवाव्यात?

1. भाज्या आणि फळे धुण्यापूर्वी साबण आणि पाण्याने आपले हात धुवा.

2. आपल्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवा

आपल्याला भाज्या आणि फळे स्वच्छ पाण्याने धुण्याची आवश्यकता आहे आणि ते साफ करण्यासाठी आपण त्यांना आपल्या हातांनी चोळा. फळे आणि भाज्या साफ करण्याचा हा सोपा आणि चांगला मार्ग आहे. 20 सेकंद साबणाने आणि पाण्याने चांगले हात धुवावे आणि त्यानंतर आपण भाज्या धुवाव्यात.

कोरोना काळात आपण शक्यतो आपल्या आहारात लिंबूवर्गीय फळे जे शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवतात. जे संक्रमणाशी लढण्यासाठी उपयुक्त आहेत. आपण आपल्या आहारात पेरू, डाळिंब, लिंबू, संत्री, बदाम, गाजर, रताळे, केळी, शेंगदाणे, सोयाबीन, टोमॅटो हे समाविष्ट करा .ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.

जेव्हा आपण भाज्या उकडता तेव्हा पाणी आणि उच्च तापमान यामुळे काही प्रमाणात त्यांची पोषक तत्वे कमी होतात. मंद आचेवर हलक्या फ्राय केल्याने त्यांच्यातील पोषक तत्वे टिकून राहतात. तर, मायक्रोवेव्हमध्ये शिजवताना त्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे देखील टिकून राहतात.भाज्या वाफेवर शिजवल्याने त्यामध्ये तेल आणि बटर वापरण्याची गरज भासत नाही. त्यामुळे भाज्यांमधील पोषक घटक टिकून राहतात. शिजवल्यामुळे शिमला मिरची आणि कोबी अशा काही भाज्यांची पौष्टिक मूल्य कमी होतात. त्यामुळे या भाज्या शिजवण्याऐवजी सलाडप्रमाणे खाणे अधिक फायदेशीर ठरते.

संबंधित बातम्या : 

(An easy way to wash vegetables and fruits during the Corona period)