केसांसाठी अत्यंत फायदेशीर असणारं अंजीर हेअर मास्क! असं बनवा

| Updated on: Apr 09, 2023 | 8:09 PM

केसांना अंजीर लावल्याने तुमच्या टाळूशी संबंधित समस्या दूर होतात. याशिवाय या हेअर पॅकच्या मदतीने तुमचे केस ही मुलायम आणि चमकदार होतात. इतकंच नाही तर हा अंजीर हेअर मास्क आपल्या गळत्या केसांना ही नियंत्रणात ठेवतो, तर चला जाणून घेऊया अंजीर हेअर मास्क कसा बनवावा.

केसांसाठी अत्यंत फायदेशीर असणारं अंजीर हेअर मास्क! असं बनवा
Anjeer hair mask
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: अंजीर हे एक अतिशय निरोगी ड्रायफ्रूट आहे जे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यामुळे ते तुमच्या आरोग्याला तसेच केसांना खूप फायदे देतं. आज आम्ही तुमच्यासाठी अंजीर हेअर मास्क बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. अंजीर आपल्या केसांना खोलवर पोषण देते. केसांना अंजीर लावल्याने तुमच्या टाळूशी संबंधित समस्या दूर होतात. याशिवाय या हेअर पॅकच्या मदतीने तुमचे केस ही मुलायम आणि चमकदार होतात. इतकंच नाही तर हा अंजीर हेअर मास्क आपल्या गळत्या केसांना ही नियंत्रणात ठेवतो, तर चला जाणून घेऊया अंजीर हेअर मास्क कसा बनवावा.

अंजीर हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • अंजीर दोन-तीन
  • पाणी

अंजीर हेअर मास्क कसा बनवावा?

  • अंजीर हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम अंजीर घ्या.
  • नंतर ते पाण्यात भिजवून थोडा वेळ सोडा.
  • यानंतर अंजीर चांगले मॅश करून पेस्ट तयार करा.
  • आता तुमचा अंजीर हेअर मास्क तयार आहे.

अंजीर हेअर मास्क कसा लावावा?

  • आपल्या टाळूवर आणि केसांच्या लांबीवर अंजीर हेअर मास्क चांगला लावा.
  • नंतर ते 20 मिनिटे केसांमध्ये सोडा.
  • यानंतर गरम पाण्याच्या साहाय्याने केस धुवून स्वच्छ करावेत.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)