मध आणि हळदीचा फेस पॅक तयार करा आणि मुरुमांच्या डागांना बाय बाय म्हणा!

| Updated on: Mar 31, 2021 | 11:46 AM

महिला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने वापरतात.

मध आणि हळदीचा फेस पॅक तयार करा आणि मुरुमांच्या डागांना बाय बाय म्हणा!
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : महिला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने वापरतात. परंतु वारंवार वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य उत्पादनांमुळे आपली त्वचा खराब होऊ शकते. त्यामध्येही बहुताश लोकांना चेहऱ्यावरील मुरूमाच्या डागाची समस्या असते. अनेक सौंदर्य उत्पादने वापरूनही चेहऱ्यावरील मुरूमाचे डाग जात नाहीत आज आम्ही तुम्हाला काही खास घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची मुरूमाच्या डागांची समस्या दूर होईल. चला तर मग बघूयात…(Applying honey and turmeric face pack will remove dark spots on the face)

एक मोठा चमचा मध, अर्धा चमचा हळद, एक चमचा दूध एका वाटीमध्ये मध आणि हळद एकत्र घ्या. मिश्रण तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेवर 15 मिनिटांसाठी लावा. डोळ्यांच्या आसपास फेस पॅक लावू नये. यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुऊन घ्या. हळदीमुळे चेहरा पिवळा दिसेल आणि चेहऱ्यावरील मुरूमाचे डाग कमी होतील. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.

एक मोठा चमचा मुलतानी माती, एक प्रोबायोटिक कॅप्सूल, दोन चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर
पेस्ट तयार करण्यासाठी सर्व सामग्री एकत्र करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेवर लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. यानंतर मॉइश्चराइझर देखील लावावे. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर थेट चेहऱ्यावर लावण्याची चूक करू नये.

बाजारात मिळणारी बरीच उत्पादने वापरल्यानंतरही, जर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स जात नसतील तर लिंबू आणि मधाची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा साधारण 15 मिनिटांनंतर हे धुवा. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्याने तुमचा चेहरा साफ होईल. निरोगी आणि चमकणारी त्वचेसाठी, एक चमचा लिंबाचा रस आणि 2 चमचे मध मिसळा. मध आपली त्वचा मॉइश्चराइझ करते. लिंबू त्वचेचे डाग आणि चेहरा स्वच्छ करतो.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Applying honey and turmeric face pack will remove dark spots on the face)