तुम्हाला एखाद्या पुरुषाला आकर्षित करायचं असेल तर काय कराल? अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही त्यांचं लक्ष तुमच्याकडे वळवू शकता. मानसशास्त्रानुसार, पुरुषांना आकर्षित करण्यासाठी उलटी पद्धत वापरतात. या पद्धतीनेच योग्य परिणाम साधता येतो! याचा अर्थ फसवणूक किंवा कपट करणं असा नाही. अशा काही गोष्टी आहेत, की त्यामुळे त्यांना तुमच्याकडे तुम्ही सहज आकर्षित करू शकाल. तुम्हाला त्यांना मिळवायचंच असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. कोणत्या आहेत या गोष्टी?
तुमच्या आणि त्याच्या दरम्यान एक “स्पेस” तयार करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही त्याला कायम कॉल किंवा मेसेज करत राहिलात, तर त्याला तुम्ही सहज उपलब्ध आहात असं वाटू शकतं. त्याच्या कॉल किंवा मेसेजला खुशीने उत्तर दिले तरी, त्याला तुमच्या व्यस्ततेचा अंदाज येऊ द्या. जेव्हा त्याला तुम्ही सहज उपलब्ध नाही असं वाटेल, तेव्हा त्याला तुमची आठवण येऊ लागेल.
तुम्ही जास्त आहारी गेल्यास तुमच्याबद्दलचं त्याचं आकर्षण कमी होईल. त्याच्यात प्रत्येकवेळी रस दाखवू नका, थोडी कमी रुची दाखवा. नेहमी तुम्हीच मेसेज पाठवू नका. फोन करू नका. थोडा संयम ठेवा. तुम्ही रसिक नाहीत, किंवा तुमचा त्यांच्यात इंटरेस्ट नाही ही भावना त्यांच्या मनात येऊ द्या. त्यामुळे ते तुमच्याकडे अधिक आकर्षित होतील.
कधी कधी बदल आवश्यक असतो! काही गोष्टी बदलून पहा. त्याच्या मेसेजला प्रतिक्रिया देण्यास थोडा वेळ घ्या किंवा कधी तरी काही प्लान रद्द करा. अचानक केलेलं हे कृत्य त्याला विचारात टाकू शकतात आणि त्याला तुमच्याशी बोलण्याची किंवा तुम्हाला पाहण्याची इच्छा वाढवू शकते.
नेहमी त्याची वाट पाहत राहू नका, त्याऐवजी स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालवा. जसे की मित्रांसोबत गप्पा मारणे, तुमच्या आवडींमध्ये लक्ष घालणे, आणि स्वतःच्या सुधारणा आणि विकासावरभर देणे. जेव्हा तो पाहील की तुम्हाला त्याची गरज नाही, आणि तुम्ही स्वतःसुद्धा आनंदी राहू शकता, तेव्हा तो तुमच्याकडे अधिक आकर्षित होऊ शकतो.