मुंबई : अॅवकाडो हे फळ आरोग्यासाठी चांगले आणि एक पौष्टिक फळांपैकी आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आहेत. या फळामुळे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते. विशेष म्हणजे यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हे फळ सलादमध्ये जास्त करून वापरले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या फळाचे नेमके कोणते फायदे आपल्या आरोग्याला होतात आणि कशाप्रकारे आपण या फळाला आहारात समाविष्ट करू शकता. (Avocado is good for health)
अॅवकाडो फळ सर्वात अगोदर कापुन घ्या त्यानंतर त्यात थोडेसे ऑलिव्ह तेल, मीठ, मिरचीपूड आणि जिरेपूड घाला आणि खा…अशाप्रकारे हे फळ दररोज खाऊन तुम्ही तुमच्या दिवसाची सुरूवात करू शकता. मेटॅबोलिक सिंड्रोम अॅवकाडोमुळे कमी होतो. अॅवकाडो सेवन करणाऱ्यांना ई जीवनसत्त्व, तांबे, मॅग्नेशियम, क जीवनसत्त्व, फोलेट, कबरेदके मिळतात. अॅवकाडो सेवनाने इन्शुलिन व होमोसिस्टीनचे प्रमाण योग्य राहते. होमोसिस्टीन वाढल्यास हृदयविकार होतो.
अॅवकाडो, मक्खन आणि जामसोबत आपण पोळी देखील खाऊ शकतो. अॅवकाडो खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोट साफ राहते. फायबर्सने परिपूर्ण असे सलाद खाल्ल्याने पोटातील जमा विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात त्यामुळे आतडी आतून स्वच्छ होऊन, बद्धकोष्टता दूर होते आणि पचनासंबधित सर्व विकारांना आळा बसतो. यातील भाज्यांमध्ये सर्व प्रकारची जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असल्यामुळे, शरीरातील जीवनसत्वांचा अभाव सलाद खाल्ल्याने दूर होतो.
अॅवकाडोचा सूप देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अॅवकाडोचा सूप तयार करण्याचे अनेक प्रकार आहेत. सूप तयार करण्यासाठी अॅवकाडो अगोदर शिजवून द्या. रोज सकाळी अॅवकाडो आणि चिकन देखील तुम्ही खाऊ शकतात. यामुळे दिवसभर तुमच्या शरीराला उर्जा मिळेल.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!
चपाती खाल्यानंतर ‘ही’ चूक अजिबात करु नका, आरोग्यास होऊ शकतं नुकसानhttps://t.co/YhmdUa5Ut6 #HealthTips | #Health | #Lifestyle | #Tv9Marathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 31, 2020
(Avocado is good for health)