रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे (high blood sugar) याला हायपरग्लेसेमिआ असेही म्हटले जाते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुम्ही जेवताना ब्लड शुगर वाढवणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. तुम्हाला जर कॉफीची (coffee) आवड असेल किंवा नाश्ता न करण्याची (skipping breakfast) सवय असेल तर तुमच्या या सवयी रक्तातील साखर वाढवण्यासाठीही काम करू शकतात, असे ईट धिस नॉट दॅट मध्ये नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही कोणते पदार्थ खाता आणि कोणत्या प्रकारच्या वातावरणात राहता, यामुळे देखील रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो.
स्नॅक्स खाण्याच्या सवयीमुळे साखरेची पातळी वाढते –
काही लोकांना असे वाटते की नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी सावधगिरी बाळगल्यानेच साखर नियंत्रित केली जाऊ शकते. मात्र खरी गोष्ट ही आहे की, आपण जे स्नॅक्स खातो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. हाय ब्लड शुगरचा त्रास असेल तर कोणते पदार्थ खाणे टाळावे हे जाणून घेऊया.
रात्री आईस्क्रीम खाणे –
जर तुम्हाला रात्री उशिरा आईस्क्रीम खायला आवडत असेल तर या सवयीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढू शकते व ते नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे रात्री आईस्क्रीम खाऊ नये.
स्नॅक्ससह करा ग्रीन टी चे सेवन –
जेव्हा तुम्ही स्नॅक्ससह ग्रीन टी पिता तेव्हा ते साखर रक्त आणि स्नायूंमध्ये सहज विरघळण्यापासून प्रतिबंध करते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे सोपे जाते.
असे करावे कार्बयुक्त पदार्थांचे सेवन –
जर तुम्ही कार्बयुक्त पदार्थांचे सेवन करत असाल तर त्यासह हेल्दी फॅट, प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवनही करावे. अशा रितीने पदार्थ खाल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते व कोणतीही समस्या उद्भवत नाही.
बेक्ड पदार्थांचे करा सेवन –
तुम्ही तळलेल्या पदार्थांपेक्षा बेक केलेल्या पदार्थांचे सेवन केले तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. मात्र याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही लगेच कुकीज, केक वगैरे पदार्थांचे सेवन करावे. ते पदार्थ खाणे टाळले पाहिजे.