Harmful Curd Combination : दह्यासोबत ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नका, अन्यथा आरोग्य बिघडेल !

| Updated on: May 19, 2021 | 11:30 AM

बाराही महिने दही खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोक आपल्या आहारात दही खातात.

Harmful Curd Combination : दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, अन्यथा आरोग्य बिघडेल !
दही
Follow us on

मुंबई : बाराही महिने दही खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोक आपल्या आहारात दही खातात. दही आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात जे पाचन तंत्राला बळकट करण्यास मदत करतात. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी -12 यासह अनेक पौष्टिक घटक असतात. (Avoid eating these foods with curd)

दह्याचे सेवन केल्याने आपली बॉडी डिटॉक्स होते. दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे. दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात.

दही आणि मासे
तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी ऐकलं असेल की दही आणि मासे एकत्र खाऊ नयेत. या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने नुकसान होते. यामुळे उलट्या, अपचनाची समस्या उद्भवू शकतात.

केळी आणि दही
केळी आणि दही कधीही एकत्र खाऊ नका. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते. त्याऐवजी आपण दूध आणि केळी खाऊ शकता.

दही आणि कांदा
उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना या दोन्ही गोष्टी खायला आवडतात. कांदा गरम असताना दही थंड असते. या गोष्टी एकत्र खाल्ल्यामुळे अॅलर्जी, गॅस, अॅसिडिटी आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. या दोन्ही गोष्टी कधीच एकत्र खाऊ नका.

दूध आणि दही
दूध आणि दही हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही दूध पीत असाल तर दही खाऊ नका आणि जर तुम्ही दही खात असाल तर दूध पिऊ नका. या दोन गोष्टी एकत्र खाऊ नयेत. यामुळे गॅस, अतिसार आणि आंबटपणाची समस्या उद्भवू शकते.

उडद डाळ आणि दही
उडद डाळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण कधीही दह्यासोबत खाऊ नका. या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने पाचन तंत्रावर परिणाम होतो, ज्यामुळे पोटा संबंधित आजार होऊ शकतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Lipstick shades | तुमच्या चेहऱ्यासाठी लिपस्टिकचा कोणता रंग ठरेल सर्वोत्तम? जाणून घ्या…  

आकर्षक वनस्पतींनी खुलवा घरांची सजावट, जाणून घ्या कशी करायची देखभाल?

(Avoid eating these foods with curd)