थंडीत हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून सकाळी उठल्यावर या चुका करणे टाळा

| Updated on: Nov 28, 2023 | 4:06 PM

heart attack Risk : हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका अधिक असतो. कारण थंडीमुळे नसा आकसतात. त्यामुळे हृदयाला अधिक काम करावे लागते. हिवाळ्यात कोणत्या चुका माणूस करतो ज्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जाणून घ्या.

थंडीत हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून सकाळी उठल्यावर या चुका करणे टाळा
Heart attack
Follow us on

Heart attack : हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी आहारात काही बदल केले पाहिजेत. आजच्या धावत्या जीवनशैलीत व्यायाम आणि योगा यासाठी देखील वेळ दिला पाहिजे. ज्यामुळे आरोग्य चांगले राहिल. थंडीत शिरा आकसतात त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे हिवाळ्यात सकाळी उठल्याबरोबर अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. सकाळी उठल्यावर काय नाही केले पाहिजे जेणेकरुन हृदयविकाराचा झटका टाळू शकतात.

हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर सकाळी उठल्याबरोबर या 3 गोष्टी करू नका

जास्त पाणी पिऊ नये

थंडीच्या दिवसात हृदयाची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. काही लोक सकाळी उठून 1-2 बाटल्या पाणी पितात, जे हृदयाविकाराच्या रुग्णांसाठी चांगले नाही. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर मोठ्या प्रमाणात द्रव पिऊ नये. याचे कारण म्हणजे सकाळी शरीर थंड असते, रक्तदाब आणि रक्तातील साखर कमी होते. अशा परिस्थितीत हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. जास्त द्रव प्यायल्यास हृदयाला जास्त काम करावे लागते. त्यामुळे सकाळी फक्त 1 ग्लास पाणी पिणे पुरेसे आहे. थंड पाणी अजिबात पिऊ नका. फक्त कोमट पाणी प्या.

लवकर उठून व्यायाम करू नये

व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सकाळ ही व्यायामासाठी उत्तम वेळ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे, परंतु हृदयाच्या किंवा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी सकाळी लवकर उठणे आणि हिवाळ्यात जड व्यायाम करणे टाळावे. त्यामुळे हृदयावर दबाव निर्माण होतो. काहींना 4-5 वाजता उठून व्यायामाला सुरुवात करण्याची किंवा थंडीत फिरायला जाण्याची सवय असते, या सवयीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. तुम्ही 7-8 वाजता हलक्या व्यायामाने दिवसाची सुरुवात करु शकता. त्यामुळे शरीरातील रक्त हळूहळू गरम होऊ लागते.

सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ करणे टाळावे

काही लोकांना सकाळी लवकर आंघोळ करण्याची सवय असते, जर तुम्ही हृदयविकाराचे रुग्ण असाल तर तुम्ही हिवाळ्यात सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करणे टाळावे. सकाळी लवकर थंड पाण्याने अंघोळ करणे हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. जर तुम्ही सकाळी आंघोळ करत असाल तर कोमट पाण्यानेच आंघोळ करा. झोपेतून उठल्याबरोबर आंघोळीला जाऊ नका. झोपेतून उठल्यानंतर अर्धा ते पाऊण तासानंतरच आंघोळ करावी.