मुंबई : वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, अनेक प्रयत्न करून ही वजन कमी होत नसल्याची अनेकांची तक्रार असते. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे, म्हणजे संतुलित आणि हेल्दी आहार जर आपण व्यवस्थित आहारात घेतला तर आपले वजन कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल. (Avoid making these mistakes while losing weight)
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी जेवण करणे टाळतात. असे केल्याने आपल्या शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही आणि आपले चयापचय देखील कमी होते. यामुळे आपल्याला वजन कमी करण्यात अडचण येतात. दिवसातून 4 ते 5 वेळा पौष्टिक आहार घ्यावा. जर तुम्हाला संध्याकाळी भूक लागली असेल तर तुम्ही फळे, दही इत्यादी पदार्थ खाऊ शकता. मात्र, पुर्णपणे जेवन बंद करणे अतिशय चुकीचे आहे.
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पुरेशा प्रमाणात प्रथिने घ्या. प्रथिने आपली भूक शांत ठेवते. या व्यतिरिक्त, कॅलरी सेवन नियंत्रित करते आणि चयापचय दर वाढवते. वजन कमी करण्यासाठी प्रथिनेयुक्त आहार समाविष्ट करा. आपण आहारात चीज, चिकन, अंडी इत्यादींचा समावेश करू शकता. याशिवाय डाळ, चणा, शेंगदाणे, सोया इत्यादींचे सेवन करू शकतात. यामुळे आपल्या शरीराला पुरेशे प्रथिने मिळतील.
वजन कमी करताना आणि व्यायामादरम्यान बरेच लोक सॉफ्ट ड्रिंक आणि चहा-कॉफी पिणे सोडतात. बहुतेक लोक यादरम्यान पॅकेजचे ज्यूस पिण्यावर भर देतात. मात्र, या ज्यूसमध्ये साखर जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे आपले वजन तसेच इतर रोग देखील वाढतात. आपल्याला दररोज 4 ते 5 लिटर पाणी पिण्याची आवश्यकता आहे. या पेयाऐवजी आपण आहारात लिंबू, हर्बल आणि साखरशिवाय ग्रीन टी घेऊ शकता.
संबंधित बातम्या :
Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!
Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Avoid making these mistakes while losing weight)