मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात हायड्रेटेड राहणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही पाणी जास्त पित असाल. याशिवाय हायड्रेटेड राहण्यासाठी कलिंगड आणि काकडी देखील फायदेशीर आहे. ते आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, उन्हाळ्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. हे बघूयात (Avoid these 5 foods during the summer season)
जास्त मीठाचे सेवन
मीठाला सोडियम क्लोराईड देखील म्हणतात. याचा उपयोग अन्नाची चव वाढविण्यासाठी केला जातो. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. यात सूज येणे, उच्च रक्तदाब आणि हृदय रोग इत्यादींचा समावेश आहे. जास्त सोडियमचे सेवन केल्यास मूत्रपिंड निकामी होऊ शकते. यामुळे डिहायड्रेशन देखील होते. मीठाचे सेवन कमी करणे चांगले आहे.
चहा आणि कॉफी
जर तुम्हाला स्वत: ला थंड आणि हायड्रेट ठेवायचे असेल तर चहा किंवा कॉफी टाळा. ते आपल्या शरीराचे तापमान वाढवतात. यामुळे आपली पाचन प्रणाली विचलित होऊ शकते. यामुळे डिहायड्रेशन देखील होते. त्याऐवजी तुम्ही लिंबू पाणी, कैरीचे पन्ने, ताक इत्यादींचे सेवन करू शकता.
तळलेले आणि जंक फूड
तळलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाहीत. आपले आवडते समोसे, बर्गर, फ्रेंच फ्राइज, जंक फूड इत्यादी आपणास डिहायड्रेशन करू शकतात. उन्हाळ्याच्या महिन्यात जंक फूड पचन करणे देखील कठीण असते. तर उन्हाळ्यात तळलेले आणि जंक फड्सचा समावेश आहारात करणे टाळा.
लोणचे
लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. लोणच्याचा अति प्रमाणात वापर टाळावा. यामुळे सूज येणे आणि डिहायड्रेशनसह समस्या उद्भवू शकतात. उच्च सोडियमयुक्त आहारामुळे संक्रमण आणि अल्सरची समस्या उद्भवू शकते. म्हणून जास्त लोणचे सेवन करणे टाळा.
मसाले
उन्हाळ्याच्या काळात नेहमीच मसालेदार खाणे टाळावे. हे आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक आहे. मसालेदार पदार्थांमध्ये मुख्यतः कॅप्सॅसिन असते. यामुळे जास्त घाम येतो. तसेच यामुळे त्वचेशी संबंधित समस्या, डिहायड्रेशन आणि इतर अनेक रोग होतात. म्हणून, उन्हाळ्याच्या काळात मसालेदार अन्न टाळावे.
(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायकhttps://t.co/y89Pxceis3#VitaminD #FoodSupplement
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020
(Avoid these 5 foods during the summer season)