हिंदू धर्मांमध्ये पाहुण्यांना अतिथी देवो भव असे म्हटले जाते. पण याचा अर्थ असा नाही की एखाद्याच्या घरी गेल्यावर तुम्ही सामान्य शिष्टाचार विसरून जाल. बऱ्याचदा लोक घरी पाहुणे म्हणून जातात आणि सामान्य वागणूक नियंत्रित करत नाही. त्यामुळे ज्यांच्या घरी पाहुणे म्हणून गेला हा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. खरं तर पुढच्या वेळी अशा पाहुण्यांना घरी बोलवणे देखील टाळले जाते. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांकडे वेळ नसल्यामुळे अनेक जण घरी पार्टीचे आयोजन करतात. पण तुमच्या चुकीच्या वागणुकीमुळे अनेकदा ज्यांनी पार्टी ठेवली आहे किंवा तुम्ही ज्यांच्या घरी गेला आहात ते अडचणीत सापडू शकतात.
वेगळ्या अन्नपदार्थाची मागणी करू नका
नवीन वर्ष आणि ख्रिसमस जवळ आले आहेत अशा परिस्थितीत अनेक जण त्यांच्या घरी पार्टीचे आयोजन करतात त्यामुळे अनेक जण एकत्र येतात. जर सर्व पाहुणे चहा किंवा कॉफी सारख्या गोष्टी पिण्यास तयार असेल तर तुम्ही स्वतःसाठी काही विशेष मागणी करू नका. असे केल्याने तुम्ही ज्यांच्या घरी जाणार आहात त्यांना केवळ तुमच्यासाठी वेगळे अन्न किंवा पेय तयार करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील आणि त्यामुळे त्यांचा वेळ वाया जाईल. म्हणूनच जे इतर पाहुणे खाता आहेत तेच खा किंवा प्या.
घराबाहेर बोलणे टाळा
जर तुम्ही कोणाच्या घरी पाहुणे म्हणून गेला तर घराबाहेर, लिफ्ट जवळ किंवा दरवाज्यात उभे राहून बोलणे टाळा. त्यामुळे तुमचे ही सवय समोरच्यासाठी त्रासदायक ठरू शकेल. उशीर होत असेल तर लगेच टाटा बाय बाय बोलून निघून जा.
सोबत नेणे टाळा
जर कोणी घरी छोटीशी पार्टी दिली असेल आणि तुम्हाला त्या पार्टी करता आमंत्रित केले असेल तर तुम्ही इतर कोणत्याही मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीला सोबत घेऊन जाणे टाळा. असे केल्याने तुम्ही ज्यांच्या घरी जाणार आहात त्यांना कदाचित ते आवडणार नाही.
रिकाम्या हाती जाऊ नका
कोणाच्या घरी जात असताना रिकाम्या हाताने जाणे टाळा. जर तुम्ही कुठे पाहुणे म्हणून गेलात किंवा तुम्हाला बोलावलं असेल तर तुमच्या सोबत एक छोटीशी भेटवस्तू नक्की घेऊन जा ज्यामुळे त्यांना आनंद होईल.