मुंबई : सध्या धकाधकीच्या जीवनशैलीत हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. बहुतेक लोक यासाठी औषधे घेतात, परंतु जीवनशैलीत आणि आहारात काही बदल केल्याने देखील या समस्येला नियंत्रित केले जाऊ शकते. काही वर्षांपूर्वी उच्च रक्तदाबाची समस्याही फक्त वयस्कर लोकांनाच होती. मात्र, आता 30-35 वर्षांच्या तरूणांना देखील उच्च रक्तदाबची समस्या होत आहे. आज आम्ही तुम्हाला उच्च रक्तदाब कसा नियंत्रणात आणायचा हे सांगणार आहोत. (Ayurved will help you to control high blood pressure issue know the remedies)
-धार्मिकदृष्ट्या, तुळशीची रोपटे अतिशय पवित्र मानले जाते. असा विश्वास आहे की, घरात हे रोपटे ठेवल्याने नकारात्मकता दूर होते, तसेच कुटुंबात आनंद आणि समृध्दीचे वातावरण तयार होते. तुळस या वनस्पतीचे महत्त्व जितके धार्मिकदृष्ट्या आहे, तितकेच आयुर्वेदातही आहे, तुळशीला आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हटले जाते, जी एखाद्या व्यक्तीला अनेक आजारांपासून वाचवते. अशी अनेक तत्वे तुळशीच्या पानांमध्ये आढळतात जी सर्दी, फ्लू आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
-आवळा आपल्या आरोग्यासह आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच आवळ्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो म्हणून रक्तदाबाची समस्या असलेल्या व्यक्तीने दिवसातून एकदा तरी आवळ्याचे सेवन केले पाहिजे.
-‘अश्वगंधा’ ही औषधी वनस्पती बाजारात वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध आहे आणि बरेच लोक त्याचा वापर करत आहेत. अश्वगंधा वनस्पतीचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. अश्वगंधाला वैज्ञानिक नाव Withania somnifera आहे. त्याचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे होतात.
-त्रिफळा हा घटक मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरला जातो. त्रिफळामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी घटक असतात. चिफळाचे सेवन केले तर उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो. तुम्ही चहामध्ये त्रिफळा टाकून याचे सेवन करू शकता.
संबंधित बातम्या :
Ginger | आरोग्यच नव्हे तर, त्वचा आणि केसांसाठीदेखील ‘आले’ गुणकारी!https://t.co/nPFt8b4LTw#Ginger । #haircare । #skincare
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 30, 2020
(Ayurved will help you to control high blood pressure issue know the remedies)