मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. विशेष करून आपण हेल्दी आणि सकस आहार घेतला पाहिजे. आपण काय खातो यावर आपली रोगप्रतिकारक शक्ती अवलंबुन आहे. यामुळे या काळात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असेच पदार्थ आहारात घेतले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. (Ayurvedic extracts are very beneficial for health)
कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने आपण नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात. विशेष म्हणजे घरच्या घरी आणि घरी असलेल्या साहित्याच्या मदतीने आपण काढा तयार करू शकतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास पेय तयार करण्यासाठी हळद, पुदिना, काळी मिरी, हिंग, लसणाच्या चार ते पाच पाकळ्या, गुळ आणि तुळशीची पाने घ्या.
एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी मंद आचेवर ठेवा. त्यामध्ये सर्वात अगोदर काळी मिरी आणि हिंग घाला. त्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घाला आणि पाच मिनिटे तसेच ठेवा. यानंतर यामध्ये गुळ, पुदिन्याची पाने आणि तुळशीची पाने घाला आणि वीस मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर हा काढा एका ग्लासमध्ये काढा आणि प्या. तुळशीचे पाने, दालचिनी, सुंठ, काळे मिरे हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 4 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या.
जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काढा पिऊ नये. यामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो आणि आपण मोठ्या समस्येत अडकू शकाल. काढा उष्ण पदार्थांपासून बनवला जातो. याच्या अति सेवनामुळे तोंडात फोड येऊ शकतात. तसेच, अॅसिडीटी, आंबट ढेकर, डोकेदुखी आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. लघवी करताना मूत्र मार्गात जळजळ उद्भवू शकते. असे काही तुमच्यासोबत घडल्यास तत्काळ सावधगिरी बाळगा. तसेच, काढ्याचे सेवन टाळा.
काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. पण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधीं वनस्पतींच्या ओव्हरडोसमुळे शारीरिक समस्या उद्भवतात. काढ्याने शरीराला अनेक फायदे मिळत असले तरी अतिसेवनाचे दुष्परिणामही आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काढ्याचे सेवन करा.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Ayurvedic extracts are very beneficial for health)