मुंबई : निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण शक्यतो घरगुती उपायांचा अवलंब केला पाहिजे. यामुळे आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार होते. (Banana, Curd and turmeric face pack are beneficial for the skin)
आपली त्वचा निरोगी आणि चमकदार दिसण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होईल. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक केळी, एक वाटी दही आणि हळद लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये दही मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर शेवटी त्या पेस्टमध्ये हळद मिक्स करा. ही पेस्ट दहा मिनिटे तशीच ठेवा आणि संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. साधारण वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.
ही पेस्ट आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा आपल्या चेहऱ्याला लावली पाहिजे.
दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सर्नबर्न आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. सन बर्न कमी करण्यासाठी त्वचेवर दही लावा आणि 15 मिनिटांनंतर त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. टॅनिंग काढून टाकण्यासाठी दह्यामध्ये 7 ते 8 चमचे बेसनाचे पीठ आणि लिंबाचा रस आणि मध घाला. ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि काही वेळ कोरडी होऊ द्या. त्यानंतर थंड पाण्याने त्वचा धुवा. हे आठवड्यातून दोन वेळा त्वचेला लावले पाहिजे.
केळी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, केळी खाणे जेवढे आपल्या आरोग्यासाठी जेवढे चांगले आहे त्यापेक्षाही अधिक आपल्या त्वचेसाठी केळी फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.
संबंधित बातम्या :
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायकhttps://t.co/y89Pxceis3#VitaminD #FoodSupplement
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020
(Banana, Curd and turmeric face pack are beneficial for the skin)