मुंबई : केळी हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. (Banana peel is beneficial for the skin)
आपल्या सर्वांना केळीच्या फायद्याबद्दल माहिती आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, केळीची साल सुध्दा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेष: आपल्या त्वचेसाठी केळीची साल गुणकारी आहे. केळीचा साल आपल्या चेहऱ्यावर चोळली तर आपली त्वचा चांगली होते आणि चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.
-कोरफडीचा गर केळीच्या सालवर टाका आणि चेहऱ्यावर साधारण 20 ते 25 मिनिचे चोळा यामुळे चेहऱ्यावरील सुरूकुत्या गायब होतील आणि आपली त्वचा ग्लोईंग होईल.
– केळ्याची साल ब्लेंडरमध्ये बारीक करून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. जर आपले त्वचा तेलकट असतील, तर त्यात कोरफड घालता आणि चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा चमकदार होता. आठवड्यातून 3 ते 4 वेळा ही पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा
-वापरासाठी केळ्याची साल नेहमी ताजी असावी. केळीची साल साठवून ठेवू नका. केळी बर्याच लोकांना पचत नाहीत. अशा लोकांनी कोणत्याही प्रकारे त्याचा त्वचेवर वापर करू नये.
-सालाची पेस्ट राहिल्यास ती रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते. तथापि, एका दिवसापेक्षा जास्तकाळ ठेवू नका.
-केळीची साल सोलल्यानंतर किंवा चेहऱ्यावर वापरल्यानंतर तुम्हाला काही समस्या आल्यास त्याचा वापर थांबवा.
(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Banana peel is beneficial for the skin)