मुंबई : आपण फळे खाल्लानंतर फळांची साल फेकून देतो. परंतु आपल्याला माहिती आहे का याच फळांच्या सालीपासून विविध फेस मास्क तयार होऊ शकतात. आणि हे आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत चांगले आहे याच्यापुढे महागडे फेशियल आणि ब्रँडेड क्रीमही अपयशी ठरू शकतात. त्यातील पोषक घटक आपली त्वचा निरोगी बनवते आणि चेहर्यावर नैसर्गिक चमक देखील येते. (Banana peel is beneficial for the skin)
केळीच्या सालातील अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म केसांचे आरोग्य देखील सुधारतात. हा हेअर मास्क लावल्याने डोक्यातील कोंडा निघून जातो, केसांची गुणवत्ता सुधारते आणि त्यांची नैसर्गिक चमक देखील येते.
-केळ्याची साल ब्लेंडरमध्ये बारीक करून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा.
-जर आपले केस तेलकट असतील, तर त्यात कोरफड घालता येईल.
-कोरड्या केसांसाठी त्यात एक चमचा नारळाचे तेल घाला.
-जर आपले केस गळत असतील, तर पपईचा तुकडा त्यात मिसळला जाऊ शकतो.
-आपल्या आवडीनुसार ही पेस्ट बनवा आणि केसांना 10-15 मिनिटांसाठी लावा. नंतर केस स्वच्छ धुवा.
-केळीची साल त्वचेवर चोळल्यास त्वचेही चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होतात.
-त्याचबरोबर ही साल चेहर्यावरील डागही कमी करण्यातही मदत करते.
-केळीची साल चेहऱ्यावर चोळताना किंवा थोडावेळ चेहऱ्यावर ठेवल्यामुळे त्वचा हायड्रेट देखील होते.
-सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर तुमचे डोळे सुजल्यासारखे दिसत असतील, तर केळीची साल ही समस्या कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकते. यासाठी ही साल आपल्या डोळ्यांवर थोडावेळ ठेवून पडून राहा.
दातही होतील पांढरे शुभ्र!
2015 च्या Detection of antimicrobial activity of banana peel या अभ्यासात दावा केला गेला होता की, केळीच्या सालातील गुणधर्म बॅक्टेरियांशी लढून दाताशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करतात. जर, यातील काही दाव्यांचा उपयोग केला, तर आपण केळीची ताज्या सालीने दात घासल्यास दातांचा पिवळसरपणा दूर होतो.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
HEALTH | ‘कोरोना’च्या धसक्याने जीवनशैलीत चांगले बदल, पावसाळी आजारांत 50% घट!
Weight Loss | वजन वाढवण्यासाठीच नव्हे तर, वजन कमी करण्यासाठीही ‘केळी’ फायदेशीर!#weightloss | #weightlossdiet | #Banana | #food https://t.co/Qrrqlm9y5A
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 19, 2021
(Banana peel is beneficial for the skin)