मुंबई : केळी हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, दररोज एक केळी खाल्ल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते. (Bananas are beneficial for weight loss)
बरेच लोक वजन वाढते म्हणून केळी खाणे टाळतात. केळी खाल्ल्याने वजन वाढते असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, दररोज एक केळी खाल्ल्याने वजन कमी होते. केळ्यामध्ये उच्च फायबर असते. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
केळी उपाशी पोटी खाल्ल्याने मायग्रेनच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे. असेही म्हटले जाते की, केळी चुकीच्या वेळी खाल्ल्यास, आपल्या रक्तातील खनिजे कमी होतात. केळीमध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
बर्याच लोकांना झोपेची समस्या असते. कमी झोप लागल्यामुळे बरेच लोक अत्यंत अस्वस्थ असतात. अशा प्रकारच्या समस्येमध्ये केळी खूप फायदेशीर ठरू शकतात. केळी खाण्याने छान झोप लागते. पोटॅशियमयुक्त केळी थकलेल्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात.
केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.आपल्या शरीरातील इम्यून सिस्टममुळे आपला वेगवेगळ्या आजारापासून बचाव होतो.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…
Health | मनुष्य जीवनाशी निगडीत ‘या’ गोष्टी जाणून घ्या आणि तणावमुक्त, सकारात्मक आयुष्य जगा!https://t.co/eNdbD2CG42#healthcaretips
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2020
(Bananas are beneficial for weight loss)